खंडाळा घाटात आता अॅण्टी मंकी डिव्हाइस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मध्य रेल्वेवरच्या कर्जत ते लोणावळा घाट सेक्शनमध्ये असलेल्या ‘मंकी हिल’ भागात माकडांच्या उच्छादामुळे अधिकाऱयांचे धाबे दणाणले आहेत. वारंवार माकडे ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्याने रेल्वे विस्कळीत होत आहे. त्यामुळे आता माकडांपासून वाचण्यासाठी नवा जालीम उपाय शोधला गेला आहे. त्यामुळे माकडे ओव्हरहेडच्या खांबावर चढू नयेत म्हणून खास ‘अॅण्टी मंकी डिव्हाइस’ वापरण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनने घेतला आहे.

‘अॅण्टी मंकी डिव्हाइस’च्या गुळगुळीत आवरणामुळे माकडे खांबांवर चढू शकत नाहीत. या डिव्हाइसच्या आत माकड शिरले तर ते आतच ट्रप होऊन अडकले जाते. माकडे ओव्हरहेड वायरवर चढल्याने सर्किट ट्रीप होते. त्यामुळे लागलीच वीजप्रवाह सुरू करता येत नाही आणि बंद पडलेल्या ट्रेनला खेचण्यासाठी वेगळे इंजिन मागवावे लागते. आता हा त्रास वाचणार आहे.