
दहशतवाद्यांना शोधणे, आंतरराष्ट्रीय पातळीवर शस्त्रात्रे, बनावट चलन, ड्रग्ज तस्करीची पाळेमुळे उखडून टाकण्याचे काम करणाऱया दहशतवादविरोधी पथकाकडे आता भलतेच काम सोपविण्यात आले आहे. एटीएसने महत्त्वाच्या कारवाया करणे अपेक्षित असताना राज्यात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पकडलेल्या 12 गांजा प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश पोलीस मुख्यालयातून एटीएसला देण्यात आले आहेत.
एटीएस हे पोलीस दलाचे महत्त्वाचे पथक आहे. दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावणे, आतंरराष्ट्रीय पातळीवर बनावट चलन, शस्त्रात्रे, ड्रग्जची तस्करी करणाऱयांना पकडणे अशी महत्त्वाची कामे एटीएसकडे असतात. दहशतवाद रोखणे हे एटीएसचे मूळ काम आहे. अलीकडे एटीएसने काही महत्त्वाच्या कारवाया केल्या. जेलमध्ये राहूनही गँगस्टर हरीश मांडवीकरकडून केल्या जात असलेल्या कारवायांचा शोध घेऊन एटीएसने मोठी कारवाई केली. अशी महत्त्वाची कामे एटीएसकडून केली जात असताना पोलीस मुख्यालयातून आता नवे फर्मान एटीएसला सोडण्यात आले आहे. त्या महत्त्वाच्या कामांवर लक्ष पेंद्रित करणाऱया एटीएसकडे आता राज्यात पकडलेल्या गांजांचे 12 गुन्हे वर्ग करण्यात आलेत. त्या गुह्यांचा तपास करून गांजा तस्करांच्या मुळापर्यंत जाण्याचे आदेश एटीएसला देण्यात आले आहेत. यामुळे एटीएसचे अधिकारी गोंधळात पडले आहेत. दहशतवादी पृत्ये आणि त्यासंबंधात अन्य कायवायांवर लक्ष ठेवायचे की राज्यातील गांजा तस्करांना शोधायचे असा प्रश्न अधिकाऱयांपुढे उभा ठाकला आहे. अशा प्रकारे गांजा तस्करांच्या मुळापर्यंत जाण्यास एटीएसला पहिल्यांदाच आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी आंतरराष्ट्रीय लिंक असलेल्या गुह्यांचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे सोपविण्यात आले होते. परंतु ते हायप्रोफाईल गुन्हे होते. पण महाराष्ट्र एटीएसकडे गांजा तस्करांना शोधून काढण्याचे काम दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.



























































