काँग्रेसची बदनामी करणाऱ्या अमित साटमांना अटक करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालाड (पश्चिम) येथील मैदानाला टिपू सुलतानचे नाव देण्याच्या मुद्दय़ावरून भाजपच्या नेत्यांनी मुंबईत गदारोळ करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात भाजप आमदार अमित साटम यांनी कट रचण्याबरोबरच समाजात शांतता भंग होण्याच्या दृष्टीने खोटी माहिती पसरवली. त्यामुळे त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज केली.

अमित साटम व त्यांच्या सहकाऱयांनी पालक मंत्री अस्लम शेख व महापौर किशोरी पेडणेकर यांचीही बदनामी केली आहे. याबाबत आझाद मैदान पोलीस ठाण्यात दाखल करत त्याची प्रत आम्ही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पाठवली आहे.

पुन्हा स्वबळाचा नारा

मुंबईतील नव्या प्रभाग रचनेचा अभ्यास करण्यासाठी मुंबई काँग्रेसने कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली असून त्यामध्ये पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा, आमदार अमिन पटेल, झिशान सिद्दिकी, माजी आमदार अशोक जाधव, असिफ जकारिया, डॉ. अजंठा यादव, भूषण पाटील, मोहसीन हैदर, सुरेश कोपरकर व जॉर्ज अब्राहम यांचा समावेश आहे. मुंबई काँग्रेस या सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे भाई जगताप म्हणाले.