मनतरंग – आयुष्य नव्याने घडवताना!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

तानियाचा घटस्फोट होऊन आता सहा महिने झाले होते. तरीही तिचे नातेवाईक तिला आणि तिच्या आईवडिलांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या तिच्या गत आयुष्याबद्दल खोदून खोदून विचारायचे आणि चुकचुकायचे. कारण तानिया तैच्या व्यावसायिक आयुष्यात स्थिरावली होती आणि हे तिने खूपच कमी वयात मिळवलेलं होतं. “आपल्या समाजात मुलीने आयुष्यात स्थिरावणं म्हणजे लग्न करून मोकळं होणं अशी मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हे असंच चालणार”

तानिया (नाव बदलले आहे) ही व्यवसायाने इंटीरियर डिझायनर. खूप मेहनतीने तिने या क्षेत्रात स्थिरावायचे ठरवले होते. त्यासाठीची तिची धडपड आणि जिद्द तिच्या घरातील लोकांना, नातेवाईकांना अशा सर्वांनाच माहीत होती. तिच्या मेहनतीचं कौतुकही होतं सगळ्यांना.

पण…आता तेच कौतुक करुणेत बदललं होतं आणि त्या करुण नजराच तानियाला असह्य झाल्या होत्या. समुपदेशनाला आल्या आल्याच तिने स्वतबद्दल बोलायला सुरुवात केली. “मला आता हे सहन होत नाही. माझे सर्व नातेवाईक मला फक्त दया दाखवत असतात. का असे वागतात तुझ्याशी सगळे?” असं तिला विचारताच तानिया लगेच उत्तरली, “कारण मी डिव्होर्सी आहे आणि आमच्या नातेवाईकांमध्ये मी कदाचित पहिलीच असेन जिने नवऱयाबरोबर घटस्फोट घेतला आहे.

तानियाचा घटस्फोट होऊन आता सहा महिने झाले होते. तरीही तिचे नातेवाईक तिला आणि तिच्या आईवडिलांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या तिच्या गत आयुष्याबद्दल खोदून खोदून विचारायचे आणि चुकचुकायचे. कारण तानिया तिच्या व्यावसायिक आयुष्यात स्थिरावली होती आणि हे तिने खूपच कमी वयात मिळवलेलं होतं. “आपल्या समाजात मुलीने आयुष्यात स्थिरावणं म्हणजे लग्न करून मोकळं होणं अशी मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हे असंच चालणार” तिच्या समुपदेशनास येण्याचे कारण स्पष्ट होत असले तरी नक्की होत नव्हते. कारण नातेवाईकांकडे काहीसे दुर्लक्ष करायला ती आता शिकली होती. मात्र कुठेतरी काहीतरी तिचे स्वतचे समाधान होत नव्हते आणि बहुधा तेच करायला तिने समुपदेशनाचा मार्ग निवडला होता. तानिया हल्ली गोंधळून जात होती. तिचा आत्मविश्वास आता कमी होत होता आणि स्वतला दोष देण्याचे प्रमाण वाढत चालले होते. त्यातच भर म्हणजे त्या दिवशी तिची आत्या घरी आली. तानियाही तिच्याशी बोलत होती. मध्येच तानियाला तिच्या मैत्रिणीचा फोन आला. त्यामुळे ती तिच्याशी बोलायला लागली. बाहेर डिनरला जायचं होतं तानिया आणि तिच्या मैत्रिणीला. त्या दोघींचं म्हणजेच तानियाचं जोरजोरात हसणं, खिदळणं तिच्या आत्याला चांगलंच खटकलं.

झालं! आत्याने तिच्यासकट आई-वडिलांना फैलावर घेतले. सगळ्यात मोठी आत्या असल्याने तिला कोणी काही बोलले नाही, पण आईने मात्र आत्याच्या बोलण्याला दुजोरा देत तानियाला मैत्रिणीसोबत जाण्यास मज्जाव केला. “तुम्हाला कळायला नको का? तानियाला नाही अक्कल. जरा कुठे नवऱयाबरोबर वाजलं, लगेच आली सोडून. वर जणू काही झालंच नाही अशा प्रकारे हुंदडतेय” असं म्हणत तिने बडबडायला सुरुवात केली. तानियाच्या ही गोष्ट जिव्हारी लागली.

“मी एवढा काय गुन्हा केलाय? घटस्फोट घेतलाय त्याला काही खाजगी कारणं होती. इतरांना काय सांगत बसू? मी काय फेस करतेय हे माझं मला माहीत आहे. मी आणि माझा नवरा सेपरेशनच्या प्रोसेसमध्ये होतो तेव्हा दोघेही ट्रॉमामध्ये होतो. मी आता कुठे मूव्हऑन करायचा प्रयत्न करतेय, पण माझे नातेवाईक हे शक्य होऊ देत नाहीयेत.”

घटस्फोटित असणाऱया किंवा त्या वेदनादायी प्रािढयेला सामोरे जाताना मनाची किती घुसमट होत असेल हे तानियाच्या उदाहरणातून दिसतेच. तानियासारख्या कितीतरी मुली तरुणपणीच हा घाव जेव्हा पचवत असतात तेव्हा त्यांना स्वतशी आणि समाजाशी झगडावे लागतेच.

कित्येकदा असं पाहिलं गेलं आहे की, घटस्फोटित असलेल्या स्त्रीला किंवा मुलीला आता बव्हंशी समाजाने स्वीकारले असले तरी मनापासून नाही हेच तानियावरून लक्षात येते आणि याचा परिणाम तानियासारख्या तरुण वयात घटस्फोट घेतलेल्या मुलींवर होतो. तानियाच्या मनावर त्या एका प्रसंगाचा खोलवर परिणाम झाला होता. ती तिच्यावर झालेला प्रसंग मैत्रिणीच्या सहाय्याने विसरू पाहत होती. तानियाला आपले दुःख घरच्यांसमोर व्यक्त करायला आवडत नव्हते आणि महत्त्वाचं म्हणजे करायचेही नव्हते. पण आता त्या प्रसंगानंतरही तिला आणि तिच्या पालकांना अजूनही मनस्तापातच रहावे लागत होते. सततचे सल्ले, क्वचित उपहासात्मक बोलणं, सांत्वना आणि सहानुभूतीपूर्वक नजरा या सगळ्याला तानिया कंटाळली होती. तिला समुपदेशनाद्वारे अतिविचारापासून सुटका हवी होती.समुपदेशन प्रािढयेमध्ये तानियाला ‘तिच्या स्वतच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी’ तयार करण्यात येत होते. त्यासाठी तिला अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर काढणे गरजेचे होते. काही सत्रे त्यासाठी दिली गेली, ज्यामध्ये तिच्यातील दुःख, राग, ताण आणि शरम या भावनांना जन्म देणाऱया विचारांवर काम करण्यात आले, ज्याद्वारे तिचे अनावश्यक विचार कमी होण्यास मदत झाली. जोडीला मेडिटेशन होतेच. या सगळ्याचा तानियाला चांगलाच फायदा झाला. सत्रांमुळे तिने स्वतसाठी पोषक नसलेल्या विचारांवर विचार करणं सोडून दिलं. स्वतसाठी वेळ द्यायला सुरुवात केली. काही सत्रांमध्ये तिच्या आईवडिलांनाही समाविष्ट करण्यात आले.

शेवटी ज्या गोष्टी तिच्या आवाक्यात होत्या (जसं इतरांच्या उपहासात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करणं) त्याच्यावरच ती नियंत्रण ठेवू शकत होती आणि ज्या नव्हत्या (लोकांची बोलणी) त्यावर तिचे नियंत्रण येणे शक्यही नव्हते. ‘ध्येयनिश्चिती आणि त्याकडे वाटचाल’ हा मध्यममार्ग तानियाने निवडला होता. तोच तिचे आयुष्य नव्याने घडवणार होता.

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत)