आगळं वेगळं – निसर्गाचा ‘कर्नाटकी’ चमत्कार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगल गोगटे

कारवारचा किनारा तर देशात सर्वात सुंदर समजला जातो. बुडी मारण्यासाठी तर इथला किनारा पूर्ण देशात जास्त छान आहे. या बेटाचं वैशिष्टय़ आहे इथलं वातावरण व शांतता. ज्यांना काहीही न करता राहता येतं त्यांच्यासाठी ही अत्यंत योग्य जागा आहे. निळ्याशार जलपटलावरून फक्त लाटांचं संगीत ऐकवणारा हा किनारा हा एक घेण्याचा अनुभव आहे.

कर्नाटक राज्यालासुध्दा इतर राज्यांप्रमाणेच श्रीमंत सांस्कृतिक वारसा आहे. कारवारचा किनारा तर देशात सर्वात सुंदर समजला जातो. बुडी मारण्यासाठी तर इथला किनारा पूर्ण देशात जास्त छान आहे.

मुरुडेश्वर, भटकल आणि होनोवर यांच्या आजूबाजूला नेत्रानी (नेत्रगुडो) व बसवराजा दुर्गा. उडुपी व मालपेजवळ सेंट मेरीज बेट, पन्ना आणि दर्या बहादुरगड ही बेटं आहेत. रंगनाथिट्टू पक्षी अभयारण्य हे बेटदेखील तिथेच आहे. कूर्गजवळ अनेक लहानगी बेटं आहेत. त्यापैकी निसर्गधाम हे बेट अतिशय सुंदर आहे.

ही सगळी बेटं निसर्गसौंदर्याने नटलेली आहेत. पण तरीही त्यात काही बेटं आहेत, जी खास आहेत. त्यात सेंट मेरीज हे बेट महत्त्वाचं. इथे कुणीही राहात नाहे. सगळीकडे नारळाची झाडं असल्याने याला नारळी बेट वा थोंसेपार असही म्हणतात. असं म्हणतात की 15 व्या शतकात वास्को डी गामा पोर्तुगालला जात असताना त्याने वाटेत कोझीकोडेजवळच्या अगदी उत्तरेकडच्या पाड्रॉन द सांता मारीया या बेटावर नांगर टाकला. मग त्याने तिथे क्रॉस उभारला व तो सेंट मेरीला समर्पित केला. हे बेट सर्वात मोठं आहे ( 500 मीटर्स लांब आणि 100 मीटर्स रुंद) आणि फक्त या बेटावरच पर्यटकांना जाण्याची परवानगी आहे. या भागात आणखीही काही मोठी बेटं आहेत – दक्षिण, उत्तर आणि दर्या बहादुरगड बेट.

या बेटांचं काही विशेष आहे. 800 लाख वर्षांपूर्वी इथल्या चुनखडीच्या खडकांमधून लाव्हा बाहेर पडून त्यातून अनेक बहुभुज खडक तयार झाले. सर्वसाधारणपणे वितळलेला लाव्हा गार होताना कोणताही आकार घेऊ शकतो. परंतु इथे थंड होताना लाव्हाने पाच, सहा वा सात बाजूंच्या खांबांचा आकार का घेतला असावा हे एक वैज्ञानिक गूढ वा गौडबंगाल आहे. भूस्तरशास्त्र्ाज्ञ या ओघवत्या लाव्हाला ‘पातळ थरांचा बनलेला’ म्हणतात. सगळ्या बेटभर वेगवेगळ्या उंचीचे खांब तयार झाले आहेत आणि सगळ्यात उंच सहा फुटी आहे. याचं महत्त्व लक्षात घेऊन आपल्या देशाने या बेटांना राष्ट्रीय भूस्तरशास्त्र्ा स्मारकांचे स्थान दिले आहे. 880 लाख वर्षांपूर्वी जेव्हा मॅडागासकर हिंदुस्थानच्या किनाऱयावरून तुटून दूर गेलं त्यावेळी हे खडक तयार झाले.
कर्नाटकची खाद्यसंस्कृती व सांस्कृतिक अशी दोन्ही अंगं पाहून झाली की तरीही काही नवीन अनुभवायचा उत्साह असणाऱयांसाठी एक वेगळी सहल आयोजित केली जाते, सेंट मेरीज बेटाची सहल. उडुपी जिह्यातील मालपे इथून एक फेरी घेऊन या बेटावर जाता येतं. अनेक प्रकारच्या लोकांना एकत्र घेऊन जाणाऱया या फेरीतून 30 मिनिटांचा प्रवास करून जाणं हा एक साहसी प्रवास आहे. बोटीचा मोठा आवाज ऐकत लाटांमधून प्रवास करताना नारळाच्या झाडांनी सजलेलं सेंट मेरीज बेट अचानक समोर उभं ठाकतं. पण ती बोट उथळ पाण्यामुळे बेटापर्यंत जाऊ शकत नसल्याने एका छोटय़ा बोटीची मदत घ्यावी लागते.

या बेटाचं वैशिष्टय़ आहे इथलं वातावरण व शांतता. ज्यांना काहीही न करता राहता येतं त्यांच्यासाठी ही अत्यंत योग्य जागा आहे. इथला पूर्ण अनुभव घेण्यासाठी इथे चालत फिरावं. फिरता फिरता पर्यटकांना जेव्हा खडकांमधून बाहेर पडणारे तीक्ष्ण धारेचे चुनखडीचे सहा धारी खडक खांब दिसतात तेव्हा तो निसर्ग चमत्कार त्यांना अवाक् करतो. या खडकांमुळे तयार झालेले खालाव सुध्दा छानच वाटतात. सप्टेंबर ते मे या काळात केव्हाही इथे जाता येतं. ऐन पावसाळ्याचा मोसम टाळावा. दिवसभर मुक्काम करता आला तरी रात्री इथे राहाणं जमवता येणार नाही.

– [email protected]