
>> मंगेश मोरे
मंगळवेढे ही श्री क्षेत्र पंढरपूरपासून 20 किलोमीटर अंतरावर वसलेली संतांची भूमी. दामाजी पंत, बसवेश्वर महाराज, कान्होपात्रा, चोखामेळा, बंका, निर्मळा, कर्ममेळा, सीताराम महाराज (खर्डीकर), स्वामी समर्थ, गोविंदबुवा, गोपाबाई, बागडेबाबा, बाळपृष्ण महाराज, टिकाचार्य, मोहिनीबुवा अशा कित्येक संतांच्या पदस्पर्शाने व वास्तव्याने पावन झालेली. मंगळवेढय़ातील संतांच्या अनेक आख्यायिका व त्यांच्या पाऊलखुणा आजही मंदिरे, स्मृती व प्राचीन अवशेषांच्या रूपात अस्तित्वात आहेत.
मंगळवेढे ही श्री क्षेत्र पंढरपूरपासून 20 किलोमीटर अंतरावर वसलेली संतांची भूमी. दामाजी पंत, बसवेश्वर महाराज, कान्होपात्रा, चोखामेळा, बंका, निर्मळा, कर्ममेळा, सीताराम महाराज (खर्डीकर), स्वामी समर्थ, गोविंदबुवा, गोपाबाई, बागडेबाबा, बाळपृष्ण महाराज, टिकाचार्य, मोहिनीबुवा अशा कित्येक संतांच्या पदस्पर्शाने व वास्तव्याने पावन झालेली. खरं तर आजपर्यंत या भूमीचे सोने व्हायला हवे होते, पण ते भाग्य या भूमीच्या वाटय़ाला अद्याप आलेले नाही. श्रीसंत महात्मा बसवेश्वराचे स्मारक तसेच इतर संतांच्या पवित्र स्मृतींचे जतन करून इथे संतसृष्टी निर्माण व्हायला पाहिजे. त्यासाठी सरकारच्या पृपादृष्टीची निकड आहे.
मंगळवेढय़ातील संतांच्या अनेक आख्यायिका व त्यांच्या पाऊलखुणा आजही मंदिरे, स्मृती व प्राचीन अवशेषांच्या रूपात अस्तित्वात आहेत. श्रीसंत दामाजी मंदिर, श्री स्वामी समर्थ मठ, श्रीसंत चोखामेळा समाधी, श्री अंबाबाई मंदिर (शनिवार पेठ), तांबडा मारुती मंदिर, बोराळे नाका, बाजार चौकातील हनुमान मंदिर, श्रीलक्ष्मी नारायण मंदिर (मुरलीधर चौक), सराफ गल्लीतील श्री विठ्ठल मंदिर, श्री एकवीरा देवीचे मंदिर, श्री जोतिबाचे मंदिर, श्री सिद्धेश्वर मंदिर, माचनुर येथील प्राचीन श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर, वरळी गावातील नृसिंह मंदिर, लक्ष्मीदहिवडी येथील प्राचीन श्रीलक्ष्मी मंदिर, नंदेश्वर येथील श्रीसंत बाळपृष्ण महाराज मठ, काळभैरवाचे प्राचीन मंदिर, गोणेवाडी येथील परमेश्वर मंदिर, हुलजंती येथील धनगर समाजाचे पुलदैवत माळीण राजा व हुन्नुर येथील विरोबा देवस्थान, तामदरडी येथील रंगसिद्ध मंदिर, चिखलगी येथील संगमेश्वर मंदिर, भिकार अकोले येथील काळभैरव मंदिर ही देवस्थाने मंगळवेढय़ाच्या संतपरंपरेची साक्ष देताहेत.
प्रभू रामचंद्राचा जळका बाण मंगळवेढय़ात पडल्याने येथील जमीन पूर्णपणे काळी व सुपीक असल्याची आख्यायिका आहे. मान व भीमा नदीच्या संगमावर महाभारतातील भीमाने गदा फिरवल्यामुळे इथली जमीन सुपीक व सपाट झाली आहे. दुसरीकडे श्रीसंत दामाजी पंत यांनी दुष्काळात त्यावेळची शासकीय कोठारे उघडून गोरगरीब जनतेला उपासमारीपासून वाचवण्यासाठी केलेले कार्य आजच्या दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला प्रेरणा देणारे आहे. स्वतः प्रत्यक्ष पंढरपूरच्या पांडुरंगाने, बादशहाच्या दरबारी जाऊन धान्याचे मोल चुकवून दामाजी पंत यांच्या भक्तीचा सन्मान केला होता. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हेदेखील 12 वर्षे मंगळवेढय़ाला वास्तव्यास होते. लिंगायत धर्माचे संस्थापक श्रीसंत बसवेश्वर त्यांच्या मामाकडे मंगळवेढय़ातच लहानाचे मोठे झाले. लोकशाही व मानवतेची मूल्ये समाजात रुजवण्यात त्यांचा सहभाग आहे.
काळभैरवाने ब्रह्मदेवाचे मुंडके छाटून काशीला जात असताना भिकार अकोले गावात रात्रभर मुक्काम केला होता. चारशे वर्षांपूर्वी औरंगजेब बादशहाने दक्षिणेत स्वारी केल्यावर साताऱयात श्रीछत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार संताजी-धनाजी यांच्या दहशतीमुळे चाल करून येण्यास घाबरला होता. सवा लाखाच्या फौजेसह औरंगजेब बेगमपूर-माचनुर या गावात साडेतीन वर्षे मुक्काम करून देशाचा कारभार चालवला होता. सवा लाखाच्या फौजेलाही त्या काळात अन्न व पाणीपुरवठा पुरवण्याची क्षमता मंगळवेढय़ात होती. मंगळवेढय़ाला प्राचीन महाराष्ट्रातील धान्याचे कोठार संबोधले जायचे. त्यामुळे मंगळवेढय़ातून वाहणारी नदी तसेच अनेक प्राचीन विहिरी व तलाव त्याकाळातील राज्यकर्त्यांच्या दूरदृष्टीची आजही साक्ष देत आहेत.
महाराष्ट्रात बिज्जल व कलचुरू राजाच्या काळात मंगळवेढे ही अतिशय प्रभावी आर्थिक राजधानी होती. पेशवाईत गाजलेले राघोबादादा व आनंदीबाईंचे लग्नही मंगळवेढय़ातील किल्ल्यात झाले होते. राजस्थानचे पुष्कर व मंगळवेढय़ातील ब्रह्मदेवाची मूर्ती हा इतिहासाचा व देशाच्या महावंशाचा अनमोल ठेवा आहे. आज महादेव विहिरीत ब्रह्मदेवाची मूर्ती अत्यंत दयनीय व भग्न अवस्थेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी राजे, नेताजी पालकर यांनीदेखील मंगळवेढय़ात वास्तव्य केल्याची इतिहासात नोंद आहे.
संतपरंपरा तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मंगळवेढय़ाचा स्वातंत्र्यानंतर अपेक्षित विकास पूर्ण झालेला नाही. श्री क्षेत्र पंढरपुरात वर्षाकाठी कोटय़वधी भाविक येतात. तेथूनच ते मंगळवेढामार्गे सोलापूर, अक्कलकोट, यमाई, तुळजाभवानीच्या दर्शनास जातात.
हा कायम टंचाईग्रस्त व अवर्षणग्रस्त तालुका म्हणून प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. इतिहास कालापासून असणाऱया विहिरी आणि तलाव ही तालुक्याला फार मोठी देणगी होती. परंतु काळानुसार लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली. त्याचप्रमाणे लोकांच्या शेती, पिण्याचे पाणी आणि व्यवसायाच्या गरजा वाढल्या आहेत. त्यामुळे या तालुक्याला पिण्याच्या पाण्यासह इतर समस्यांनी घेरले आहे. मंगळवेढे शहरात मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य, पृषी, पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था, स्वच्छता आदी सुविधांची वानवा आहे.
मनोहर जोशी हे मुख्यमंत्री असताना नवे पंढरपूर निर्माण करण्याचा आणि श्रीक्षेत्र पंढरपूरचा विस्तार करण्याचा प्रस्ताव ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू गवळी यांनी सादर केला होता. त्यावेळी सरकारने श्रीक्षेत्र पंढरपूरचा सर्व्हे करून आराखडा तयार करण्याचे काम सिडकोला दिले होते.
आताच्या घडीला मंगळवेढय़ात संतसृष्टी निर्माण करण्यासाठी तसेच क्षेत्र पंढरपुराचा विस्तार करण्यासाठी सिडकोसारख्याच सक्षम प्राधिकरणाची नियुक्ती करणे गरजेचे आहे. मंगळवेढय़ातील सर्व गावांच्या विकासासाठी एक हजार कोटींच्या तरतुदीची मागणी केली जात आहे. सरकारने ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन या भूमीकडे लक्ष दिले तर हिंदुस्थानासह संपूर्ण जग मंगळवेढय़ाकडे आदर्श संतांची भूमी व तीर्थक्षेत्र म्हणून पाहील.


























































