निमित्त – उपग्रह टॅगिंगद्वारे कासवांचा प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मोहन उपाध्ये

ऑलिव्ह रिडले कासवांमध्ये एका नेस्टिंगच्या काळात दोन ते तीन कलच असतात. म्हणजे एक मादी कासव दोन ते तीन वेळा अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येते. या टॅगमुळे एक मादी एकाच किनाऱयावर अंडी घालण्यास परत येते का? किती दिवसांच्या कालावधीमध्ये येते असाही अभ्यास करण्यात येणार आहे (माहिती मिळणार आहे). ही माहिती पुढील दोन वर्षे आपल्याला मिळणार आहे. तीच मादी पुढल्या वर्षी अंडी द्यायला परत त्या किनाऱयावर येते का हेही यामधून समजणार आहे. जास्तीत जास्त दोन वर्षे ही माहिती आपणांस मिळणार आहे. जोपर्यंत टॅग मादीच्या पाठीवरून निघून पडत नाहीत पिंवा त्याची बॅटरी पूर्ण उतरत नाही तोपर्यंत.

पश्चिम किनारपट्टीला विणीकरिता येणारी ऑलिव्ह रिडले कासवे ही नक्की कुठून येतात. अंडी घालून झाल्यावर ती नक्की कुठे जातात याचा शास्त्र्ााrय अभ्यास झाला नसल्यामुळे तसेच त्यांच्या खाण्याच्या शोधातील प्रवास, ती जागा समजणे हा अभ्यास करणे महत्त्वाचा असल्याने याच मुख्य उद्देशाने या कासवांना टॅगिंग करणे ठरविले.

रत्नागिरी जिल्हय़ातील वेळास हे एक छोटे गाव. या गावामध्ये सहय़ाद्री निसर्गमित्र, चिपळूण या संस्थेचे काही लोक पांढऱया पोटाच्या समुद्री गरुडाचा अभ्यास करण्यासाठी आले असता वाळूमध्ये अंडय़ांची कवचे मिळाली. ही कवचे कसली आहेत याची चौकशी केल्यावर गावातील काही लोकांनी माहिती दिली, साधारण रात्री पिंवा पहाटे समुद्रातून कासव बाहेर वाळूमध्ये येते आणि खड्डा करून अंडी घालून परत जाते. पुढे काय होते या अंडय़ांचे असे विचारणा केल्यावर माहिती अशी मिळाली की, गावातील लोक ही अंडी चोरतात. स्वतः खातात, बैलांना तयार करायला त्यांनाही खायला घालत आणि उरलेली अंडी विकतात. संस्थेने पुढे गावामध्ये जनजागृती केली. मादी कासवाची अंडी लोकांकडून घेतली आणि एक संरक्षित जाळी तयार करून त्यामध्ये ती अंडी सुरक्षित केली. साधारण 45 ते 55 दिवसांनंतर त्यामधून पिलं बाहेर येऊ लागली. ही गोष्ट गावात समजताच गावकरी किनाऱयावर आले आणि ती पिले समुद्राकडे जाताना बघून खूश झाले. संपूर्ण गावाने ठरविले की, पुढे कोणीही अंडी चोरायची नाहीत आणि कासव संवर्धन मोहिमेला सुरुवात झाली. सगळय़ांपर्यंत ही कासवाची माहिती पोहोचणे गरजेचे होते. ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम झाले, परंतु शहरामध्येही याची जाणीव होणे गरजेचे होते.म्हणून सन 2006 साली पहिला कासव महोत्सव करण्याचा निर्णय झाला. या सर्व कामाला मोलाची मदत होती ती म्हणजे वन विभागाची.

कासव महोत्सवामध्ये नवजात पिले समुद्राच्या दिशेने कशी जातात हे पाहण्यासाठी पर्यटकांनी विशेष पसंती दाखवली. त्यामुळे गावातील लोकांना पर्यटकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून पैसा मिळू लागला आणि गावाला एक नवीन ओळखही मिळाली. कासव महोत्सवादरम्यान सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा पर्यटकांसाठी निश्चित करण्यात आल्या. त्यावेळी पिले असतील तर त्यांना सोडण्यापूर्वी सर्व नियम सांगण्यात येतात. पाण्यापासून साधारण 100 ते 150 मीटर अंतरावर जिथे पिले खाली वाळूत ठेवली जातात, तिथे बॅरिकेड लावली जातात. पिलांना लोकांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी असे केले जाते. लोकांना बॅरिकेडच्या बाहेरूनच या पिलांना पाहता येते पिंवा आपल्या पॅमेऱयामध्ये चित्रीत करता येते.

संरक्षित जाळीमुळे कोल्हे, कुत्रे यांच्यापासून अंडय़ांचे संरक्षण होते आणि प्रत्येक किनाऱयावर असणाऱया बीच मॅनेजरमुळे अंडय़ांमधून वाळूवर आलेल्या पिलांना पाण्यातही सुरक्षितपणे जाता येते, नाहीतर खेकडे आणि पक्षी त्यांना सहज खाऊ शकतात. ही संरक्षण संवर्धन मोहीम सुरू असतानाच त्या कासवांच्या जीवनशैलीचा अभ्यासही संस्थेने केला आणि कासव महोत्सवामुळे रत्नागिरी जिल्हय़ातून नव्हे तर महाराष्ट्र, हिंदुस्थानातून, परदेशातून अनेक पर्यटक वेळास गावाला भेट देऊ लागले आणि बघता बघता हे संरक्षण संवर्धनाचे काम मोठे होऊ लागले. पुढे सन 2016 मध्ये आंजर्ले, तालुका दापोली येथेही कासव महोत्सवाला सुरुवात झाली. वेळास आणि आंजर्ले महोत्सवाला अनेक लोक येऊ लागले. वन विभागाबरोबर कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान, मुंबई यांनी पुढाकार घेऊन बीच मॅनेजरला मानधन देण्याची जबाबदारी स्वीकारली. कांदळवन कक्ष आणि महाराष्ट्र मत्स्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्मिळ सागरी प्रजाती तसेच समुद्री कासवे यांना मच्छीमारीदरम्यान जाळय़ातून सुरक्षितपणे जिवंत पाण्यात सोडतेवेळी होणाऱया जाळय़ाचे नुकसान लक्षात घेऊन त्यांचा पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची योजना तयार केली आणि त्याला स्थानिक मच्छीमारांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. सदर योजनेमध्ये आजवर देवमुशी तसेच समुद्री कासवांना सुरक्षितपणे पाण्यात सोडण्यात आले. त्याकरिता रक्कम अदा करण्यात आली. कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान, वन विभाग इतके करूनच थांबले नाही. त्यांनी सागरी कासव संरक्षण संवर्धन या कामाला संशोधनाची जोड देण्याचे ठरविले आणि कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान वनविभाग यांनी भारतीय वन्य जीव संस्थान (WII) या संस्थेबरोबर समुद्री कासवांना सॅटेलाईट ट्रान्समीटर बसविण्याचे काम करायचे निश्चित केले. या ट्रान्समीटर बसवण्यामागे अभ्यास हेतू पुढीलप्रमाणे होता. हिंदुस्थानच्या पूर्व किनाऱयावर अशा प्रकारचे टॅगिंग करण्यात आले होते. त्यामध्ये पूर्व किनाऱयावरील ओरिसा राज्यामधील कासवे बंगालच्या उपसागरामध्येच फिरताना आढळली. श्रीलंकेमध्ये सॅटेलाईट टॅग बसविलेली काही कासवे पूर्व किनाऱयावर फिरतानाच्या नोंदी करण्यात आल्या, परंतु ही कासवे आपल्या हिंदुस्थानच्या पश्चिम किनारपट्टीवर कधीच आढळली नाहीत. त्यामुळे आपल्या किनारपट्टीला येणारी ऑलिव्ह रिडले समुद्री कासवे आणि पूर्व किनाऱयावरील ऑलिव्ह रिडले ही पूर्णपणे वेगळी असल्याचे समजते.

पश्चिम किनारपट्टीला विणीकरिता येणारी ऑलिव्ह रिडले कासवे ही नक्की कुठून येतात. अंडी घालून झाल्यावर ती नक्की कुठे जातात याचा शास्त्र्ााrय अभ्यास झाला नसल्यामुळे तसेच त्यांच्या खाण्याच्या शोधातील प्रवास, ती जागा समजणे हा अभ्यास करणे महत्त्वाचा असल्याने याच मुख्य उद्देशाने या कासवांना टॅगिंग करणे ठरविले. पूर्व किनाऱयावर बसविलेल्या ट्रान्समीटरपेक्षा आता पश्चिम किनारपट्टीवर बसविण्यात आलेले ट्रान्समीटर हे अधिक माहिती पुरवणार आहे. ती म्हणजे पूर्व किनारपट्टीची कासवे किती खोल समुद्रात जातात याची माहिती मिळत नव्हती, परंतु आताच्या टॅगमुळे पश्चिम किनारपट्टीची कासवे समुद्रात किती खोलवर जातात, किती मीटरवर आराम करतात याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे त्यांची अन्य असलेली जागा कुठे आहे त्याचाही अभ्यास होणार आहे. याचबरोबर ही कासवे कुठे कुठे प्रवास करतात याची माहिती समजणार आहे.

या कासवाचे सिग्नल हे सुरुवातीला एक दिवसआड, त्यानंतर एक आठवडय़ाने अशा प्रकारे मिळतील. त्याप्रमाणे टॅगला प्रोग्राम केले असल्याने पुढील दोन वर्षे आपल्याला माहिती मिळणार आहे. सदर सॅटेलाईट ट्रान्समीटर बसविण्याचे काम कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान मुंबई, वन विभाग यांच्याकडून भारतीय वन्य जीव संस्थान (WII) यांना देण्यात आले. यासाठी (WII)ला 9.8 लक्ष रुपये देण्यात आले आहेत. सन 2021-22 मध्ये एकूण पाच समुद्री कासवांना अशी ट्रान्समीटर बसविण्यात येणार आहेत. पैकी दोन वेळास आणि आंजर्ले किनाऱयावर बसविण्यात आली असून पुढील काही काळात बाकी तीन मादी कासवांना अशी ट्रान्समीटर बसविण्यात येणार आहेत.
(लेखक मॅनग्रोव्ह फाऊंडेशनमध्ये कार्यरत आहेत.)
z [email protected]