दक्षिणोत्तर सुरावटींचा ‘मास्टर’ मिलाफ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> निलय रमाकांत वैद्य

‘दी मास्टर्स’ ही मैफल आज रविवारी संध्याकाळी 7 वाजता सायनच्या षण्मुखानंद ऑडिटोरियममध्ये सादर होणार आहे. राहुल रानडेच्या संकल्पनेवर आधारलेल्या या बैठकीत उस्ताद राशीद खान आणि शंकर महादेवन यांची जुगलबंदी रंगणार आहे. सूत्रसंचालन सचिन खेडेकरचं असून हा हिंदुस्थानी आणि कर्नाटकी शास्त्रीय संगीताचा सहजसुंदर संगम आहे.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत श्रेष्ठ की कर्नाटकी? घराण्यांपैकी कोणतं श्रेष्ठ? ग्वाल्हेर की आग्रा, किराणा की भेंडी बाजार की, जयपूर की पतियाळा की, इंदूर की मेवाती…? काय फरक आहे यांच्यात नेमका? सौंदर्यशास्त्र्ाानुसार कोणतं बावनकशी सोनं आहे? असे आणि अशा प्रकारचे अनेक प्रश्न शास्त्र्ााrय संगीत प्रेमींना अस्वस्थ करतात, पण रसिकांना अस्वस्थ करणं हे संगीताचं कार्य नसून श्रोत्यांना तृप्त करणं हा हेतू असतो. आपला हरहुन्नरी संगीतकार राहुल रानडेचंही हेच म्हणणं असावं बहुधा. म्हणून त्याने एका झक्कास मैफलीचं आयोजन केलंय. शीर्षक आहे ‘दी मास्टर्स’. यात हिंदुस्थानी संगीतातले दिग्गज गायक राशीद खान आणि कर्नाटकी संगीतातले दिग्गज शंकर महादेवन आमने सामने येणार आहेत. त्यांची जुगलबंदी सायनच्या षण्मुखानंद ऑडिटोरियममध्ये आज रविवारी संध्याकाळी 7 वाजता रंगणार आहे. साथीला वादकांमध्ये पंडित विजय घाटे, श्रीधर पार्थसारथी, अजय जोगळेकर, पद्मा शंकर, मुरूड अली खान, वरद कथापूरकर, प्रसाद पाध्ये, सूर्यकांत सुर्वे हे नावाजलेले कलावंत आहेत. मैफलीच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सचिन खेडेकरवर आहे.

‘दी मास्टर्स’विषयी बालताना राहुल रानडे म्हणाला, ‘हिंदुस्थानातील दोन श्रेष्ठ संगीतधारा एका व्यासपीठावर एकत्र आणण्याचा माझा प्रयत्न आहे. राशीद खान आणि शंकर महादेवन यांची दृढ अर्थाने जुगलबंदी या ठिकाणी रंगणार आहे, पण ही स्पर्धा नाही किंवा कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ हे ठरवण्याचं व्यासपीठही नाही. हे ठिकाण आहे रसिक श्रोत्यांना एकाच मैफलीत दोन्ही संस्कृतीतील सौंदर्यस्थळे अनुभवण्याचं.’

उस्ताद राशीद खान ‘दी मास्टर्स’ या मैफलीविषयी उत्सुक आहेत. त्यांना शंकर महादेवनसोबत गायन सादर करण्याची संधी अनेक वर्षांनंतर मिळत आहे. त्यामुळे ते भावुक झाले आहेत. मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांच्या चेहऱयावर आनंद स्पष्ट दिसत होता. तीच भावना शंकर महादेवनच्या मनात होती. विशेष म्हणजे दोघांच्याही मनात राहुल रानडेविषयी आदराची भावना आहे. शंकर महादेवन म्हणाला, ‘‘राहुल रानडे हा स्वतः बुद्धीवादी संगीतकार आहे. त्याची संगीताची जाण सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांच्या संकल्पनेवर आधारलेली मैफल ही दर्जेदार होणारच. उस्ताद राशीद खान यांची कीर्ती सर्वदूर पसरलेली आहे. त्यांची गायकी रसिकांच्या मनाचा ठाव चटकन घेते. माझ्यासाठी ‘दी मास्टर्स’ ही मैफल एक आव्हान आहे.’’