मूव्हिंग ऍव्हरेज : एक वरदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रवीण धोपट

मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांची सरासरी लक्षात घेऊन पुढील अंदाज वर्तवले जातात आणि त्यानुसार ट्रेडिंगचे प्लॅन आखले जातात. मार्केट अनॅलिसिसमध्ये ऍव्हरेज या शब्दांचे महत्त्व मोठे आहे. ऍव्हरेज म्हणजे मध्य किंवा सरासरी. गाडी एका रस्त्यावरून जात असताना कधी तिचा वेग वाढतो, कधी मंदावतो. रस्त्याला कधी चढ असतात, कधी उतार. रस्त्याला काही वळणे असतात, तर कधी खड्डे लागतात. या सर्व परिस्थितीत गाडीचा वेग एकसारखा राहत नाही, पण गाडीने एक अंतर कापल्यानंतर तिचा सरासरी वेग किती होता हे सांगता येते. मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांची सरासरी लक्षात घेऊन पुढील अंदाज वर्तवले जातात आणि त्यानुसार ट्रेडिंगचे प्लॅन आखले जातात. ऍव्हरेजचा नेमका कसा आणि कधी वापर केला जातो हे जाणून घेऊया.

टेंड आयडेंटिफिकेशन ः मूव्हिंग ऍव्हरेजच्या सहाय्याने टेंडची दिशा कोणती असेल हे सांगता येते. शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म ऍव्हरेजच्या रिलेशनशिपमधून प्राइस मूव्हमेंट अपटेंड असेल की, डाऊनटेंड हे सांगता येते.

सपोर्ट आणि रजिस्टन्स लेव्हल ः मूव्हिंग ऍव्हरेज हा स्वतःच एक सपोर्ट आणि रजिस्टन्सची लेव्हल निर्माण करतो. प्राइस नेहमीच ऍव्हरेज पॉइंटला आल्यानंतर बाऊन्स बॅक करीत असते. ही लेव्हल ट्रेंडरसाठी एंट्री आणि एक्झिटचे काम करीत असते.

अचूक अंदाज ः शेवटी अंदाज हा अंदाजच असतो, परंतु मूव्हिंग ऍव्हरेज त्या अंदाजाची तीव्रता कमी करीत असतो. टेडिंग करतानाचा नॉइस कमी करण्याचे काम मूव्हिंग ऍव्हरेज करीत असतो.

क्रॉस ओव्हर ः वेगवेगळय़ा मूव्हिंग ऍव्हरेजमधला क्रॉस ओव्हर हा टेंड चेंज होण्याचा सिग्नल समजला जातो. उदाहरणार्थ शॉर्ट टर्म ऍव्हरेज लॉन्ग टर्म ऍव्हरेजला वरच्या बाजूला क्रॉस करतो तेव्हा ती अपटेंडची सुरुवात समजली जाते.
निश्चिती ः अनिश्चित मार्केटमध्ये निश्चित काहीच नसते. तरीही मूव्हिंग ऍव्हरेज ट्रेंडच्या ताकदीचा अंदाज देऊ शकतो. जर प्राइस सातत्याने मूव्हिंग ऍव्हरेजच्या वर वावरत असेल तर तो स्ट्रॉन्ग बुलिश सेण्टिमेंट समजला जातो.

रिव्हर्सल पॉइंट ः जर प्राइस मूव्हिंग ऍव्हरेजची दिशा बदलून अचानक विरुद्ध दिशेला जायला लागली तर हा ट्रेंड बदलाचा सिग्नल समजायला हरकत नाही. अशा वेळी आहे त्या प्राइसला एक्झिट घेणे किंवा विरुद्ध दिशेला एंट्री घेणे हाच पर्याय असतो.

प्राइस मूव्हमेंट ः मार्केटमध्ये जेव्हा आणीबाणीची वेळ असते तेव्हा गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी निर्णय चुकतात आणि नुकसान होते. याच परिस्थितीत मूव्हिंग ऍव्हरेज मदतीला येतो. मूव्हिंग ऍव्हरेज मार्केटमधला नॉइस कमी करतो आणि प्राइसची योग्य मूव्हमेंट समजायला मदत करतो.

थोडक्यात, मूव्हिंग ऍव्हरेज टेंडरसाठी एक उपकारक साधन आहे. योग्य ट्रेंड, अचूक एंट्री-एक्झिट आणि प्राइस मूव्हमेंटचे स्वभाव समजून घेण्यासाठी मूव्हिंग ऍव्हरेजचा खूप महत्त्वाचा वाटा असतो.

(लेखक दीपंकर फिनकॅप इन्व्हेस्टमेंट
प्रा. लि. येथे गुंतवणूक सल्लागार आहेत)