
>> प्रा. हरी नरके
जगातील 210 देश कोरोनाच्या फेऱयात सापडले आहेत. त्याने घेतलेल्या बळींची संख्या एक लाखाच्या वर गेली आहे. कोरोनाची ही महामारी म्हणजे चीनची दुष्ट करणी आहे. आपल्या शेजारी असलेला हा देश आपल्याशी नेहमीच कट्टर शत्रुत्व ठेवून वागत आलेला आहे. आजही त्याच्या कुरापती सुरूच असतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चीनकडून असलेल्या धोक्यांचा इशारा खूप आधी दिला होता.
कोरोनाचा विषाणू चीनमधून जगभर पसरवला गेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषा वापरून सांगायचे झाले तर या वणक्यात सारे जग होरपळून निघत असून चीनच्या चुकीची शिक्षा आज हिंदुस्थानसह संपूर्ण जगाला भोगावी लागत आहे. हा विषाणू निसर्गातून जन्मला की चीनने प्रयोगशाळेत तयार करून जगात पोहोचवला यावर मतभिन्नता आहे. या जैविक महायुद्धाने सारे जग पोळून निघाले आहे. चीनचे लालभाई सत्ताधीश महत्त्वाकांक्षी, हुकूमशाही वृत्तीचे आणि आक्रमक आहेत हे आजवर अनेकदा सिद्ध झालेले आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱया लाखो तरुणांना रणगाडय़ांखाली चिरडून मारणारे चिनी सत्ताधीश क्रूरकर्मा आहेत हे वेगळे सांगायला नको. आज चीनची मुजोरी, इतर देशांना छळण्यासाठी वापरली जाणारी बाजारू अर्थनीती आणि संयुक्त राष्ट्र संघटनेत चीन वापरीत असलेला नकाराधिकार म्हणजे व्हेटोचा अधिकार, हे सारे बघितले की चीन काहीही करू शकतो यावर विश्वास बसतो. सत्तेसाठी हे भयंकर आक्रमणकारी लोक काहीही करू शकतात. जगातील सगळी प्रगत राष्ट्रं आज चीनच्या विषाणूमुळे कोलमडून पडली आहेत. ही चीनची पद्धतशीर रणनीतीही असू शकते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांचा द्रष्टेपणा असा की, त्यांनी साडेसहा दशकांपूर्वीच हिंदुस्थानला याबाबत जागे केले होते. ‘‘साम्यवाद्यांना लोकशाहीचे वाकडे असते. त्यांना नीतिमत्ताही नको असते. माओ हा चीनमध्ये ज्याप्रमाणे तिथल्या बौद्धांना अमानुष वागणूक देत आहे ते पाहाता तो पंचशील पायदळी तुडवणारा सत्ताधीश आहे, हे उघड दिसते. भारताने चीनबरोबर मैत्री करू नये. हिंदुस्थानने लोकशाहीवादी राष्ट्रांशी मैत्री करायला हकी,’’ असेही ते म्हणाले होते.
राज्यसभेचे सदस्य म्हणून बोलताना बाबासाहेब पुढे म्हणतात, ‘साम्यवाद आणि लोकशाही कधीच एकत्र नांदू शकत नाही. साम्यवादी देशांच्या शेजाऱयांनी सतत साकध राहायला हके. चीनला आपली सरहद्द हिंदुस्थानला भिडकिण्यासाठी हिंदुस्थाने मदत करावी हे दुर्दैवी आहे. ही चूक हिंदुस्थानला फार महागात पडू शकते. चीनला आक्रमणाची चटक लागलेली आहे. माओने तिबेट करारात पंचशील आणि अनाक्रमण याला मान्यता दिलेली असली तरी माओचा पंचशीलावर विश्वास नाही. चिनी राजनीतीची 2 तत्त्वे आहेत. एक म्हणजे त्यांची राजनीती ही सतत बदलणारी असते. दुसरे म्हणजे त्यांच्या जगात नीतीला मुळी जागाच नसते. आशिया हा त्यांच्यामुळे आज रणक्षेत्र झालेला आहे. साम्यवादी जीवन आणि शासन पद्धती जी राष्ट्रे स्वीकारतात त्यांच्यापासून हिंदुस्थाने दूरच राहावे.’’
नेहरू सरकारमधील कायदेमंत्रीपदाचा 1951 मध्ये राजीनामा देताना बाबासाहेबांनी राजीनाम्याची जी पाच कारणे दिली होती त्यातले एक म्हणजे नेहरू सरकारची मवाळ परराष्ट्रनीती त्यांना मान्य नव्हती. शेजारी राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध ठेवणे हे प्रथमदर्शनी योग्य असले तरी व्यवहाराचा आणि संभाव्य धोक्यांचा विचार डोळय़ाआड होता कामा नये. बाबासाहेबांना मनापासून असे काटत होते की चीन आणि पाकिस्तान हे दोन शेजारी देश हिंदुस्थानचा विश्वासघात करणार. भविष्यात हिंदुस्थानला या दोघांपासून धोका आहे असे त्यांनी बजावले होते. जे पुढे फार लवकरच खरे ठरले. स्वातंत्र्योत्तर हिंदुस्थानवर सगळय़ा लढाया लादल्या त्या या दोन देशांनीच. या दोन देशांमुळेच हिंदुस्थानला संरक्षणावर अतोनात खर्च करावा लागतोय याबाबत बाबासाहेबांनी फार पूर्वीच चिंता व्यक्त केलेली होती.
संरक्षणनीतीमध्ये भाबडेपणाला स्थान असता कामा नये. चीनने बौध्द तिबेटची जी ससेहोलपट केली त्यावर बाबासाहेब सक्त नाराज होते. खरं तर चीन आणि हिंदुस्थान या दोघांनाही प्राचीन इतिहास आणि संस्कृतीचा महान वारसा लाभलेला आहे. चीनसोबत आपले अनेक शतकांपासून व्यापारी संबंध राहिलेले आहेत. रशियाने दुसऱया महायुद्धानंतर शेजारचे दहा देश बळकावले होते. त्यामागे असलेला विस्तारवादी, आक्रमणशील नीतीचा मुद्दा रशिया आणि चीन दोघांनाही लागू पडतो, असे बाबासाहेब आंबेडकर सांगतात.
अमेरिका आणि इंग्लंडमध्ये अर्थशास्त्रातले महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेताना बाबासाहेबांना अनेक शीर्षस्थ मार्क्सवादी विचारवंतांचा सहवास लाभला. त्या काळात त्यांनी मार्क्सवादाचे सखोल अध्ययन केले. मात्र पुढील काळात ते जसजसा बुद्धाचा अभ्यास करू लागले आणि चौफेर शोध घेऊ लागले तसतसे ते हिंसक मार्गावर आधारलेल्या मार्क्सकावादापासून दूर गेले. दरम्यानच्या काळात चीन आणि रशियामध्ये लोकशाहीची जी नृशंस हत्या करण्यात आली त्यामुळे सच्चे लोकशाहीवादी बाबासाहेब आंबेडकर कम्युनिझमपासून दूर गेले. 1954 साली मुंबईत बोलताना आपण महात्मा फुले यांना कधीही सोडणार नाही असे सांगताना बाबासाहेबांनी मार्क्सला आपण सोडीत असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. बाबासाहेबांनी स्कतंत्र मजूर पक्षाची 1936 साली स्थापना केली, त्या वेळी काही कम्युनिस्ट मित्रांशी त्यांची जवळीक होती. मात्र पुढे या मार्क्सवादी मंडळींनी बाबासाहेबांचे काही सहकारी, कार्यकर्ते पळवले. 1952 च्या लोकसभा निवडणुकीत आपली मतं कुजवा, पण बाबासाहेबांना पराभूत करा हा डांग्यांनी केलेला विश्वासघात बाबासाहेबांच्या जिव्हारी लागला. या सगळय़ा पार्श्वभूमीवर काठमांडूच्या जागतिक धम्म परिषदेत बाबासाहेबांनी बुद्ध की मार्क्स याबाबत जाहीरपणे मार्क्स नाही तर बुद्धच आपला मार्गदाता असल्याचे घोषित केले. मार्क्सवादाची सखोल चिकित्सा बाबासाहेबांनी आपल्या लेखनात केलेली आहे. या विषयावर त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही ढाले-ढसाळ वादातून खूप चर्चा झालेली आहे. हा विषय कायम चर्चेचा आणि वादाचा राहिलेला असला तरी कम्युनिस्ट चीन हा धोकादायक देश असल्याने हिंदुस्थानने व हिंदुस्थानींनी त्याच्यापासून सावध राहायला हवे हा त्यांचा इशारा आज अतिशय मोलाचा ठरलेला आहे.
[email protected]
(लेखक ज्येष्ठ संशोधक असून ते Dr Babasaheb Ambedkar : Writings and Speeches या ग्रंथमालेचे संपादक होते)



























































