
>> तरंग वैद्य
फिशिंग म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून केली जाणारी फसवणूक. बँकेतून बोलतोय असे सांगून आपले तपशील आपल्याकडून काढून घ्यायचे आणि ते वापरून आपले पैसे लंपास करायचे याला फिशिंग म्हणतात. आपले क्रेडिट कार्ड बंद होणार आहे असे घाबरवून किंवा बँकेतर्फे, कुठल्या संस्थेमार्फत बक्षीस मिळत आहे असे प्रलोभन दाखवून आपल्याला फसवायचा प्रयत्न केला जातो. अनेकजण या जाळय़ात अडकतात आणि क्षणार्धात त्यांच्या खात्यातून मोठी रक्कम काढली जाते. झारखंडमध्ये जामतारा नावाचा एक जिल्हा जो हिंदुस्थानची phising capital म्हणून कुप्रसिद्ध आहे. म्हणून या मालिकेचे पूर्ण नाव आहे ’जामतारा-सब का नंबर आयेगा.’
नेटफ्लिक्स ओटीटीवर 10 जानेवारी 2020 रोजी ‘जामतारा,’ या नावाची वेब सीरिज आली आणि प्रचंड गाजली. पुढे सप्टेंबर 2022 मध्ये ’भाग 2’ ही आला. पहिल्या भागात 25 -40 मिनिटांचे दहा, तर दुसऱया भागात आठ एपिसोड होते. झारखंडमध्ये जामतारा नावाचा एक जिल्हा आहे, वस्ती साधारण दहा लाखांच्या आसपास. इथे घडणाऱया सत्य घटनांवर आधारित या कथेचा केंद्रबिंदू जामतारा आहे. म्हणूनच या मालिकेचे नाव आहे ’जामतारा.’
जामतारा हिंदुस्थानची phising capital म्हणून कुप्रसिद्ध आहे. फिशिंग म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून केली जाणारी फसवणूक. बँकेतून बोलतोय असे सांगून आपले तपशील आपल्याकडून काढून घ्यायचे आणि ते वापरून आपले पैसे लंपास करायचे याला फिशिंग म्हणतात. आपले ाsढडिट कार्ड बंद होणार आहे असे घाबरवून किंवा बँकेतर्फे, कुठल्या संस्थेमार्फत बक्षीस मिळत आहे असे प्रलोभन दाखवून आपल्याला फसवायचा प्रयत्न केला जातो. समंजस लोक असल्या कॉल्सना दाद देत नाहीत, पण अनेक या जाळय़ात अडकतात आणि क्षणार्धात त्यांच्या खात्यातून मोठी रक्कम काढली जाते. आपल्या सर्वांनाच कधी ना कधी असे फोन नक्कीच आलेत. म्हणून या मालिकेचे पूर्ण नाव आहे ’जामतारा-सब का नंबर आयेगा.’ जेव्हापासून देशात पैशांची डिजिटल देवाणघेवाण सुरू झाली तेव्हापासून पैसे मधल्यामध्ये लंपास करायचे गुन्हेही सुरू झाले आणि इतके वाढले की, त्यांची शहानिशा करण्यासाठी सायबर क्राईम विभाग सुरू करावा लागला.
मुंबई, पुणे, दिल्ली, भोपाळ… देशातील कुठल्याही शहरांत फोनवरून अकाऊंट साफ होतं. हे फोन कॉल्स जामतारा इथून केले जातात असे समजते. मग अर्थातच तपास सुरू होतो. लुबाडून त्रस्त झालेल्यांची व्यथा न दाखवता या मालिकेत लोकांच्या पैशांवर मजा मारणाऱयांचे आयुष्य दाखवले आहे. बघताना आश्चर्य वाटतं. कारण हे सर्व प्रकार करणाऱयांचे वय आहे सोळा ते वीस वर्षे. आपण करीत असलेला प्रकार गुन्हा आहे हे या कोवळय़ा वयातील मुलांना माहीतच नसतं. ते फक्त सोप्या पद्धतीने पैसे मिळवून मजेत आयुष्य जगत असतात. गुन्हे नोंदवले जातात, पण कुठल्याही प्रकारच्या पुराव्याअभावी या गुह्यांची दखल घेतली जात नाही. एका वर्तमानपत्रात ’एका वर्षात जामताराने पन्नास लाख कमावले’ अशी बातमी येते आणि तिथल्या आमदाराचे डोळे उघडतात. हा प्रकार बंद करण्यासाठी नव्हे, तर हे सर्व आपल्या हातात घेण्यासाठी. तो प्रेमाने, धमकावून आणि संरक्षणाची हमी देऊन या सगळय़ा मुलांना आपल्या अधीन घेतो, गुह्यांचा जोर वाढतो. प्रशासन जागे होते, चोर-पोलीस हा खेळ सुरू होतो. सोबत या मुलांचे आयुष्य, आपापसातील भांडणं, निवडणुका आणि राजकारण दाखवत मालिका पुढे जाते.
अभिनय म्हणाल तर सगळीच मुलं तशी नवखी आहेत. मुख्य पात्र सनी आणि रॉकी… जी स्पर्श श्रीवास्तव आणि अंशुमन पुष्कर यांनी समरसून साकारली आहेत. आमदाराच्या भूमिकेत अमित सियाल प्रभावी आहेत. सनीची मैत्रीण आणि पत्नीच्या भूमिकेत मोनिका पवारने दमदार अभिनय केला आहे. दिब्येंदू भट्टाचार्य जे वेब सीरिज माध्यमातून प्रकाशझोतात आले, खूपच कसलेले अभिनेते आहेत. एका समंजस पोलीस अधिकाऱयाची भूमिका त्यांनी छानच निभावली आहे. एस.पी. जया रॉय यांच्यावर बेतलेली कडक एसपीची भूमिका अक्षा परदासनीने कडक पार पाडली आहे.
गुन्हा, गुन्हेगार या सर्वांच्या पलीकडे या मालिकेत एक कटुसत्य उघड केलं आहे हे दाखवून की, आमदार त्याच्या भागातील राजा असतो. अधिकारी येतात आणि जातात, पण तो तिथेच असतो म्हणून नाइलाजाने का असेना, पोलीस, प्रशासन, पत्रकार सगळेच त्याच्या बाजूने उभे असतात. मग त्याला भीती कोणाची? त्याचे शिक्षण कितीही असो, तो चुटकीसरशी आयएएस अधिकाऱयाची बदली करू शकतो. इतर पोलिसांना खेळण्याप्रमाणे वापरू शकतो हे बघून चीड येते आणि आपण काहीच करू शकत नाही याची खंतही वाटते.
वेब सीरिजना कुठल्याही पद्धतीची सेन्सॉरशिप नसल्यामुळे या मालिकेत भरपूर शिव्या आहेत. पूर्वी शिव्या भांडण झाल्यावर वापरल्या जायच्या, हल्ली सर्रास वापरल्या जातात. आपण रस्त्याने जाता येताना ऐकत असतो, पण घरी… त्यामुळे घरी ही मालिका बघताना या बाबीचा विचार करा आणि मगच ठरवा. एक मात्र खरं, हल्ली असले फसवणुकीचे फोन येणं कमी झालं आहे हे नक्की. कदाचित लोक जागरूक झालेत म्हणून आणि सायबर विभाग सक्षम झाला आहे म्हणून, पण काही प्रमाणात हा प्रकार कमी करण्यात या मालिकेचाही वाटा आहे असे मला वाटते. त्यामुळे कानांवर होणारा अत्याचार सहन करून एकदा ही मालिका बघून घ्या.
[email protected]
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)


























































