
>> विनायक
जगात सगळीकडेच जोपर्यंत शेती आणि व्यापार हेच प्रमुख व्यवसाय होते, तोपर्यंत सुबक घडीच्या सुरकुत्या नसलेल्या झकपक कपडय़ांची गरज नव्हती. मात्र औद्योगिक उत्क्रांतीनंतर कारखान्यांमध्ये काम करणारी मंडळी वेशभूषेविषयी सजग झाली. त्यातही ऑफिसांमध्ये काम करणारे ‘बाबू’ लोक तर अधिकच. आपल्याकडे धोतर, कोट, टोपी पिंवा नऊवारी साडी अशी वेशभूषा होती तोपर्यंत बिनसुरकतलेल्या घडीच्या कपडय़ांचा विचारही कुणाच्या मनात आला नाही. स्वच्छ धुतलेली, सुती, रेशमी तसेच लोकरीची वस्त्र्ां वेळोवेळी वापरली जायची. मात्र इंग्रजी राजवटीत आधी इथल्या पुरुषांचा पोषाख बदलला. शर्ट, पॅन्ट, कोट, हॅट असा ऐटदार बाज आला. चपलांच्या जागी बूट आले. या राजवटीने इंग्लिश भाषा आणि त्यांची संस्कृतीही जगात अनेक ठिकाणी रुजवली. ‘परीट घडीचे’ म्हणजे इस्त्राr केलेले कपडे परिधान करणं हीसुद्धा ‘प्रतिष्ठेची गोष्ट’ बनली.
पन्नास-साठ वर्षांपूर्वी निदान शहरात आणि गाव खात्यातल्याही कचेऱयांमध्ये काम करणारे इस्त्राr केलेले कपडे घालणं प्रतिष्ठsचं मानत हेही खरं. आम्हीही रात्री बिछान्याखाली घडी करून ठेवलेला गावठी ‘इस्त्राr’चा शर्ट घालून शाळेत जायचो. अर्थात त्यामुळे तो फार ‘पॉश’ वगैरे दिसत नसे, पण तेवढंच समाधान.
इस्त्राrला इंग्लिश शब्द ‘आयर्न’ आणि इस्त्राr करण्याला ‘प्रेस’ करणे. अगदी आरंभीच्या काळात युरोपात सपाट लोखंडी ठोकळा विस्तवावर तापवून आणि त्यावर बसवलेलं हॅन्डल पकडून कपडे ‘सपाट’ पिंवा सुरकुत्याविरहित केले जायचे. म्हणून त्याला ‘फ्लॅट आयर्न’ पिंवा ‘क्लॉथ आयर्न’ असं म्हणत. हळूहळू कपडय़ांचे आकार लक्षात घेऊन पुढे निमुळत्या आकाराच्या आणि सुमारे सात किलो वजनाच्या पोकळ इत्र्या तयार होऊ लागल्या. त्यात कधी निखारे तर कधी गरम पाणी भरलं जायचं. पिंचित पाणी शिंपडलेल्या कपडय़ांवरून ही इस्त्राr फिरवली की, ते ‘सपाट’ व्हायचे. मग विशिष्ट पद्धतीने त्यांच्या घडय़ा घातल्या जायच्या आणि जरा रुबाबदार दिसण्याचं स्वप्न पूर्ण करायचं!
ऑफिसांमधल्या बाबू लोकांची पाश्चात्त्य वेशभूषा आपल्याकडेही रुजली आणि कपडय़ांना ‘इस्त्राr’ करून देणाऱयांचा स्वतंत्र व्यवसाय जन्माला आला. मुंबईतही कोळशाच्या निखाऱयावर तापवलेली फ्लॅट इस्त्राr करून देणाऱयांची दुकानं नाक्यानाक्यांवर पिंवा चाळीमध्ये तळमजल्याच्या जिन्याखाली दिसू लागली.
पेट्रोलचा वापर वाढल्यावर त्याचाही वापर युरोपात इस्त्राrrमध्ये होऊ लागला. विविध प्रकारची, जास्त काळ गरम राहणारी तेलंसुद्धा कित्येकदा वापरली, पण यात इस्त्राrतील द्रवपदार्थ कपडय़ांवर सांडून कपडा डागाळण्याची आणि जळण्याची भीती भरपूर होती. निखाऱयांच्या इस्त्राrद्वारे सुबक कपडेही अनेकदा कोळशाची काजळी लागलेले असायचे याचा अनुभव आम्हीही घेतलाय, पण त्या वेळी त्याचं कुणाला काही वाटत नसे.
सुबक घडीसाठी इस्त्राrची गरज लागते ती मुख्यत्वे सुती कपडय़ांना. खादीचे स्टार्च केलेले इस्त्राrचे कपडे वापरण्याची ‘फॅशन’ एकेकाळी आपल्याकडे होती. कालांतराने कृत्रिम धाग्यांची निर्मिती होऊन टेरिलिन, नायलॉन अशा प्रकारच्या धाग्यांचे कपडे तयार होऊ लागले. ते वापरानंतर सुरकुतण्याचं प्रमाण कमी झालं तरी त्यालाही काळजीपूर्वक इस्त्राrr करणारे होतेच.
18व्या शतकापासून ‘आयर्न’ केलेल्या कपडय़ांचा प्रसार वाढला. आधी युरोपात मग अमेरिकेत असं करत या पद्धतीने आज जग व्यापलंय. 1880 मध्ये इलेक्ट्रिकची (आत कॉइल पिंवा पह्टोस्टॅट असलेली) इस्त्राr आली असं म्हटलं जातं, पण त्याबद्दल मतभेदही आहेत. 1892 नंतर घरोघर विजेचे दिवे आणि कनेक्शन (जुळणी) झाल्यावर मात्र घरगुती वापराच्या ‘फ्लॅट आयर्न’चं उत्पादन सुरू झालं. विसाव्या शतकात त्याने वेग घेतला. जुन्या, मध्ययुगीन इंग्लिश भाषेत ‘सॅड’चा एक अर्थ ‘घट्ट’ (सॉलिड) असाही होता. त्यामुळे घट्ट लोखंडी ठोकळा तापवून कपडे फ्लॅट करण्याला ‘सॅड आयर्निंग’सुद्धा म्हणत! आता घरी कपडय़ाला इस्त्राrr करताना हाताला चटका पिंवा मंद ‘शॉक’ लागला तरच ती ‘सॅड’ आयर्न ठरेल! 1940 ते 1950 च्या दरम्यान विविध आकारांच्या, वापरायला सुलभ, वजनाच्या हलक्या, परंतु परिणामकारी ‘फ्लॅट आयर्न’चं उत्पादन खूप वाढलं. आता जगात नेमके किती कोटी (की अब्ज?) लोक आयर्न पिंवा इस्त्राrचे कपडे वापरतात याची मोजदाद करणं कठीण. अमेरिकेत काही काळ इस्त्राrrला ‘गुजिंग आयर्न’ असंही म्हणत ते गूज (हंस) पक्ष्याच्या निमुळत्या मानेसारख्या आकारावरून. अर्थात ‘आयर्निंग’ पिंवा कपडे ‘प्रेस’ (दाब) करायला दिलेत असंच बोललं जातं.
बदलत्या काळात कपडय़ांची गुणवत्ता (क्वॉलिटी) अधिक चांगली होत होत आता न सुरकुतणारे कपडेही मिळतात. ते निर्माण होतात त्या वेळची ‘सुबक घडी’ धुण्यानंतरही तशीच राहते. शिवाय एकेकाळी फक्त खाण मजूर वगैरे वापरत तशा जाड कापडाच्या ‘जीन्स’चा जमाना असल्याने तसंच टी शर्ट वगैरे वापरताना नव्या पिढीला इस्त्राr केलेले कपडे वापरण्याचं अप्रूप वाटत नाही. कुठे कॉन्फरन्स, ड्रेस कोड पिंवा इंटरह्यू असेल तरच असे कपडे त्यांना वापरावे लागतात. तरीही इस्त्राrवाल्यांचा व्यवसाय सणासुदीच्या, लग्नसराईच्या काळात जोरात चालतोच.

























































