वेब न्यूज – ‘हवामान बदला’च्या विरुद्धच्या युद्धासाठी 4 नवी ‘शस्त्र’

631

1896 मध्ये स्वीडिश शास्त्रज्ञ स्वांते अरिनिअस यांनी वातावरणातील उष्णता शोषक वायूंच्या अस्तित्वामुळे पृथ्वीच्या तापमानावर परिणाम झाला की नाही याचा शोध लावला. त्याने गणना केली की, जर कार्बन डायऑक्साइडची वाढ दुप्पट झाली तर जागतिक तापमानात 5 डिग्री सेल्सिअसने वाढ होईल. आज शंभर वर्षांनी आपण हा धोकादायक अंदाज खरा ठरवण्याच्या गंभीर मार्गावर आलो आहोत. सध्या ज्या प्रमाणात आपण कार्बन आणि इतर घातक वायू हवेत पसरवत आहोत तोच वेग जर कायम राहिला तर 2100 सालापर्यंत पृथ्वीचे तापमान 8 ओ डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढलेले. हवामान बदल अर्थात ग्लोबल वॉर्मिंग विरुद्धच्या या लढाईसाठी हवामान तज्ञांनी चार शस्त्रांचा वापर करण्याचा सल्ला पुन्हा नव्याने दिलेला आहे. ही चार शस्त्र म्हणजे 1) मोठ्या प्रमाणावरती झाडे लावा. वृक्ष लागवडीत हवामानातील विविध संकटांना तोंड देण्याची अपार क्षमता आहे. 2) घातक कार्बनला कार्बोनेट मिनरल्समध्ये बदला. ज्या प्रमाणे सीशेल्स आणि चुनखडी नैसर्गिकरीत्या बनतात त्याचप्रमाणे कार्बन मिनरलॅलायझेशन या तंत्राद्वारे कार्बन डायऑक्साइडचे कार्बोनेट खनिजांमध्ये रूपांतर होते. 3) पृथ्वीचा पृष्ठभाग सूर्याच्या ऊर्जेला अधिक प्रमाणात पुन्हा अंतराळात परावर्तित करेल यासाठी प्रयत्न करा. साधी गडद पांढर्‍या रंगाने रंगवलेली इमारतींची छपरेदेखील मोठ्या प्रमाणावरती ऊर्जा शोषण करून शहराला थंड ठेवण्यासाठी मदत करतात. 4) कमी प्रदूषण करणार्‍या प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी वेगवेगळे प्रयत्न करणेदेखील गरजेचे आहे. 2015 साली आंतरराष्ट्रीय शिपिंग उद्योगाने सुमारे 800 मेगाटन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित केले आणि हा आकडा शतकाच्या मध्यभागी दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. या एका उदाहरणावरूनच प्रदूषणविरहित वाहतुकीची तर किती नितांत आवश्यकता आहे हे लक्षात येते.  ‘Renewable energy’ चा वापर करत नसणार्‍या जहाजांचा वेग 20 टक्क्यांनी कमी करून इंधन बचतीचा उपायदेखील संशोधकांनी सुचवलेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या