‘ती’चं घराचं स्वप्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रतिनिधी

स्वतःच्या घराचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. केवळ महिलांनी महिलांसाठी रास्त किंमतीत उपलब्ध करून दिलेली घरं… थोडी वेगळी संकल्पना.

हक्काचं घर हवंय पण बजेट परवडत नाहीय?…तर आता निःशंक व्हा. त्रिमित रचनाने खास महिलांसाठी ‘हर हायनेस्ट’ बाय द वूमन, फॉर द वूमन असा गृहप्रकल्प सादर केला आहे. त्यांच्या या अनोख्या प्रकल्पाने महिलांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे आणि तेही अगदी त्यांना परवडणाऱ्या दरात. लोणावळ्याजवळ वडगाव येथे हा गृहप्रकल्प असणार आहे, या प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेऊया त्रिमित रचनाच्या सर्वेसर्वा प्रज्ञा पोंक्षे यांच्याकडून.
कोणी हक्काच्या निवाऱयासाठी रात्रीचा दिवस करत असतात तर कोणी भविष्याची तरतूद म्हणून घर घेण्याचे स्वप्न उराशी बाळगतात. ते प्रत्येकाचे स्वप्न असतं. यात महिलाही मागे कशा राहतील़? त्याही त्यांच्या घरासाठी पैशांची जमवाजमव, काटकसर करतच असतात. अशावेळी जमवलेल्या पैशातून घर घेण्यासाठी जातात, काही वेळेला घर आवडतं पण त्याची किंमत मात्र त्याच्या आवाक्याबाहेर असते. पण त्रिमित रचनाच्या ‘हर हायनेस्ट’ या गृहप्रकल्पाने त्यांच्या मनात आशेचा किरण निर्माण केला आहे ते व्यवसायाने कमर्शिअल इंटिरिअर असलेल्या प्रज्ञा पोंक्षे या महिलेने. महिलांसाठी काहीतरी करण्याच्या ध्येयाने ‘हर हायनेस्ट’ या संकल्पनेची निर्मिती झाली. या संकल्पनेविषयी त्या सांगतात की, दहा-पंधरा वर्षापासून ‘हर हायनेस्ट’ ही संकल्पना त्यांच्या डोक्यात सुरू होती पण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी बराच वेळ गेला. कारण त्यासाठी बरीच मेहनत होती, अभ्यास होता. पण महिलांना परवडणारे आणि हक्काचे घर बांधून त्यांचे स्वप्न साकार करायचे असा निर्धारच त्यांनी केला होता. त्याप्रमाणे त्या कामाला लागल्या आणि मागच्या सात-आठ महिन्यात या संकल्पनेला मूर्त रूप आले अशी भावना प्रज्ञा पोंक्षे व्यक्त करतात.

पुढे त्या सांगतात की, मुलगी जन्माला येते ती वडिलांच्या घरी येते, तिचे लग्न होते ती नवऱयाच्या घरी जाते. पण तिच्या अस्तित्वाचे काय? तिही संसारासाठी काटकसर, जमवाजमव करतच असते. आता काळ बदलला आहे, आता प्रत्येक महिलेला तिची ओळख निर्माण करायची आहे. उद्या तिला वाटलं मुलांच्या उच्च शिक्षणासाठी माझ्याकडूनही हातभार लागावा तर, ते घर विकून त्याचे पैसे शिक्षणासाठी वापरता येतील. कधी पैशांची चणचण जाणवू लागली, काही संकट आलं तर त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी हे घर म्हणजे त्यांच्यासाठी भविष्याची तरतूदच असणार आहे. अशावेळी तिला तिचं घर आसरा असू शकतं असेही त्या व्यक्त करतात.

आज त्यांच्या या संकल्पनेला विविध स्तरांतून महिला बऱयापैकी प्रतिसाद देत आहेत. त्यांना परवडणाऱया घराबाबत चौकशी करतायत, त्यांना नेमके घर कसे हवे आहे त्या मोकळ्या मनाने व्यक्त करतायत. खरोखरच त्या या संकल्पनेविषयी विचार करू लागल्या आहेत. मुंबईत त्यांना ही संकल्पना सध्याच्या घडीला त्यांना परवडणारी नाही. पण भविष्यात या गृहप्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाला तर प्रयत्न नक्कीच करु असेही त्या सांगतात.

वडगावात गृहप्रकल्प
लोणावळ्याच्या पुढे वडगाव नावाची खूप सुंदर जागा आहे, टेकडी आहे तिथे हा गृहप्रकल्प राबवतोय. 1बीएचके, 2बीएचकेचे फ्लॅट या प्रकल्पात असणार आहेत. त्यासाठी प्रतिसादही खूप छान येतोय. महिलांनी जर प्रतिसाद दिला तर त्या भक्कम संकल्पनेला मी पुढे नेऊ शकेन. उद्या कुठल्याही बिल्डरसोबत प्रोजेक्ट निगोशिएट करू शकतो. या प्रकल्पात देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांच्या वीरपत्नींना डिस्काऊंटमध्ये घर देण्याबाबत त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

इच्छुकांनी संपर्कासाठी
वडगावमध्ये घर घेण्यास इच्छुक असलेल्या महिलांनी त्यांच बजेट, त्यांना कोणत्या ठिकाणी घर हवंय, त्याचबरोबर ‘हर हायनेस्ट’ कडून काय अपेक्षा आहेत हे https://www.trimitrachana.com/her-highnest या संकेतस्थळावर भरायचे आहे. त्याला मिळालेल्या प्रतिसाद लक्षात घेता पुढे विचार केला जाईल. या प्रकल्पाविषयी अधिक माहिती हवी असल्यास त्रिमित रचनाच्या प्रज्ञा पोंक्षे [email protected] किंवा 9820533676 या क्रमांकावर संपर्क साधावा.