माणूसपणाच्या शोधात…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मलिका अमरशेख

पूर्वीच्या परीकथेत राक्षसाचा प्राण सातासमुद्रापार असलेल्या पोपटात असायचा. आपले प्राण कशात आहेत ते आपल्यालाच माहीत नसते. कुणाचे प्राण शब्दांत, कुणाचे प्रेमात, कुणाचे व्यक्तीत, कुणाचे जातधर्म, देवदैव यांसारख्या निरर्थ निर्जिवात पण आणि कुणाकुणाला तर माहीतच नसते की त्यांचे प्राण नेमके कशात आहेत ते. आपले प्राण आपल्या माणूसपणाच्या फळात नक्कीच नसणार.

माणूसपणाचं फळ अजून कवच आहे, वरची साल रंगीत पक्व दिसते. विलोभनीय… पण आत तक्षक लपलेला…! कांद्यात कशा एकावर एक साली असतात तशी माणूसपणावर एकावर एक साली. एक चांगुलपणाची साल, एक त्यामागे थोडाशी असूयेची, नंतर वाईटपणा, नंतर लोभ, नंतर खाष्टपणा, नंतर क्रूरता, नंतर थोडा भलेपणा अशा अनेक साली… आतला गाभा विकृत सडलेला पण असू शकेल किंवा एक चिरंतन पक्व तेजाळ सत्याची बी. सत्याची बी कुणीच खात नाही..! फेकूनच देतात. कारण सत्याची बी पचतच नाही ना! ती हातात धरणारे हात वेगळेच असावे लागतात. लोखंडाचे पोलादी…

खूप भूक लागते ज्यावेळी जठराग्नी प्रदीप्त होतो तेव्हा खाल्ले नाही तर जाठररस पोटातल्या आंतरस्रावांना खातात असं म्हणतात. आपणही खूप काळापासून माणूसपणाला खाऊ लागलोय. अजून गाभ्यापर्यंत पोचलोच नाही. पूर्वीच्या परीकथेत राक्षसाचा प्राण सातासमुद्रापार असलेल्या पोपटात असायचा. आपले प्राण कशात आहेत ते आपल्यालाच माहीत नसते. कुणाचे प्राण शब्दांत, कुणाचे प्रेमात, कुणाचे व्यक्तीत, कुणाचे जातधर्म, देवदैव यांसारख्या निरर्थ निर्जिवात पण आणि कुणाकुणाला तर माहीतच नसते की त्यांचे प्राण नेमके कशात आहेत ते. आपले प्राण आपल्या माणूसपणाच्या फळात नक्कीच नसणार.

जगातली सगळी म्युझियम्स धुंडाळली. जुन्या लोकांची शस्त्र, चिलखत, सुऱया, वस्तू, दागिने, कपडेबिपडे… माणूसपणाचे फळ दिसलेच नाही कुठे. प्राणिसंग्रहालयात गेलो. मठ्ठ दिसणारा गेंडा गवत रवंथ करत होता. विचारलं त्याला…
‘‘माणूसपणाचं फळ पाहिलंस का?’’
‘‘छे, हूं… सगळे माझ्याचसारखे आहेत. काही पिंजऱयात, काही बाहेर!’’
वाघसिंहाच्या पिंजऱयाकडे गेलो. त्यालाही विचारले. त्याने एक मोठ्ठी जांभई दिली.
‘‘फळबिळ नाही. काही दोन पायाची विचित्र जनावरं येतात. सेल्फी काय घेतात. डोळे काय वासतात. एकाने तर फळ सोड, शेंगाच दिल्या खायला. मूर्ख लेकाचा. खाऊन टाकला हात त्याचा. पण त्यात पण माणूसपणाचे फळ नव्हतेच म्हणा…’’ घाबरून दूर होत बाहेर आलो.
माणूसपणाचं फळ शोधत शोधत दूरदेशी गेलो. बुरखे घातलेली माणसे. काहींच्या हातांना नखे असावीत लांब तशा बंदुकाच फुटलेल्या. दिसला माणूस घाल गोळी. दिसला माणूस दे फाशी. नाक्यानाक्यावर माणूस मारायचे कारखानेच उघडलेले. माणूसपणाचे फळ नाही, पण फळातला आत लपलेला तक्षक अजस्त्र्ा होऊन पूर्ण शहराला वेढा घालून बसलेला. एकेकाला डंख मारत. पूर्वी एका प्राचीन गंथात देवाने विराट रूप दाखवलेले. असुरांनी विराट रूप दाखवलेला दाखला पहिलाच. धारिष्टय़ झालेच नाही प्रश्न विचारण्याचे…

पुढे गेलो दुसऱया देशात. तिथे एकजण अण्वस्त्रााला धार लावत बसलेला, तर दुसरा अण्वस्त्राचे बी मातीत पुरत होता. विचारले तर शांतपणे म्हणाला, ‘‘हे काय? पाहा की…! हे अण्वस्त्राचं बी मातीत पुरलं की यालाच माणूसपणाचे फळ येणार. तुला हवंय का?’’ ‘‘नको नको.’’ पुढे चाललो. पुढे शुभ्र धवल नगाधिराज… तपस्या करणाऱया ऋषितुल्य भव्य तेजस्वी लखलखत्या चांदीची कांती असणाऱया पर्वतराजापुढे नतमस्तक होत विचारणा केली…
‘‘आपण माणूसपणाचं फळ पाहिलंय काय?’’

पांढऱयाशुभ्र बर्फाळ दाढीवरून हात फिरवत नगाधिराज धीरगंभीर स्वरात उच्चारले, ‘‘खूप पूर्वी कोटय़वधी वर्षांपूर्वी एक फळ पाहिले होते. पण पक्व होण्याअगोदरच ते नाहिसे झाले. कदाचित ते अजून असेल कुठेतरी, कारण जेव्हा जेव्हा त्या फळाचे एक साल सडून पडते तेव्हा माझाही एक भाग गळून पडतो.’’
‘‘असे कसे?’’
‘‘कारण की कदाचित माझा जन्म न् त्या फळाचा जन्म एकाच वेळी एकाच घटकातून झाला असावा. पण जेव्हा जेव्हा त्या फळाचा एक भाग वाईट होतो तेव्हा मात्र मी चांगला असूनही माझे एक एक भाग गळून पडतात!’’ नगाधिराजच्या उंच शिखरावरून शुभ्र अश्रू प्रपातागत नदीरूपात वरून खाली पडू लागले.
‘ही गंगा नव्हे… हे माझे अश्रू आहेत. माणूसपणाचं फळ सडतंय हे मला पाहवत नाही.’’
दुःखी अंतःकरणाने वंदन करून पुढे निघालो अवकाशात तारे लखलखू लागलेले. एक उल्का तुटून पृथ्वीच्या वातावरणात आपले तेजपुंज रूप घेऊन वेगाने धावत येताना पाहिली. तिला विचारलं…
‘‘माणूसपणाचे फळ पाहून का धावत आली आहेस?’’
‘‘अरे रे… इथेही नाहीच का ते माणूसपणाचं फळ?’’ आणि ती आक्रोशत अंतर्धान पावली.
शांत धीरगंभीरपणे परिक्रमा करणाऱया चंद्राला अखेर विचारलं…
‘‘हे शीतल अमृतमय प्रकाश देऊन अंधःकाराला दूर करणाऱया शशीराज, तू तर सर्व वसुंधरेला सर्व बाजूंनी पाहत आलायस. तू तरी पाहिलेस का माणूसपणाचे फळ?’’ तो शांत सौम्यपणे मंद स्मित करत हसला…
‘‘इथे माझ्याकडे काही यंत्रं… किंचित ज्ञान नावाचा जख्ख म्हातारा आलेला खरा… पण त्यांच्या हातात तर महासत्ता… लालसा… वर्चस्व… असलीच फळे होती. तू म्हणतोस तसे माणूसपणाचे फळ काही मी पाहिले नाही.’’
‘‘अरे रे.. किती दुर्दैव! पण तुला काय वाटतं? असेल का माणूसपणाचं फळ या वसुंधरेवर?’’
‘‘थोडय़ाच वेळात माझी जाण्याची वेळ येईल. मग सहस्र प्रकाशकिरणांचा स्वामी असा तो तेजस्वी जहाल रवी येईल. त्याचे लखलखीत प्रकाशनेत्र तर सर्वदूर पोचतात, कदाचित त्याला माहीत असेल..!’’
थकून मातीत बसून घेतलं… दूरवरून आवाज येत राहिला…
‘‘वह सुबह कभी तो आयेगी
वह सुबह कभी तो आयेगी…
माना के अभी तेरे मेरे अरमानों की किमत कुछ भी नही। मिट्टी का भी है मोल, मगर इंसानों की किमत कुछ भी नही। इंसानों की किमत झुठे सिक्कों में ना तौला जायेगी। वह सुबह कभी तो आयेगी।

[email protected]