
>> अतुल कहाते
अलीकडच्या काळात हा मुद्दा चर्चेला येण्याचं मुख्य कारण म्हणजे हिंदुस्थानमध्ये याविषयी फारशी फिकीर केली जात नसली तरी युरोपीय देशांमध्ये मात्र याविषयी बराच आरडाओरडा केला जातो. लोकांवर जाहिरातींचा मारा करणं, त्यांच्या परवानगीशिवाय त्यांची खाजगी माहिती गोळा करणं अशा गोष्टींवर तिथे कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यांचा भंग करण्याचे परिणाम गुगलसारख्या बलाढय़ कंपन्यांनाही मोठा दंड भरून सोसावे लागले आहेत. त्यामुळे याविषयी चर्चा सुरू झाली. तसंच वेबसाईट्सनी लोकांना ‘कुकी’ फाईल पाठवण्याआधी त्यांना पूर्वकल्पना द्यावी असं ठरलं. हिंदुस्थानसकट अनेक देशांनी अशा पूर्वकल्पनेची संकल्पना उचलून धरली. त्यामुळेच अलीकडे आपण एखाद्या वेबसाईटला प्रथमच भेट देतो तेव्हा ती वेबसाईट आपली या ‘कुकी’साठी परवानगी मागत असल्याचं आपल्या लक्षात येईल.
इंटरनेट म्हणजे त्यावर सगळं फुकटच मिळणार अशी एक प्रकारची समजूत लोकांच्या मनात रुजली आहे. बातम्यांपासून ई-मेलच्या सुविधेपर्यंत लोकांना सगळं फुकट हवं असतं. गाणी फुकट डाऊनलोड करायची असतात. हे सगळं संबंधित वेबसाईट्सना कसं परवडणार? साहजिकच त्यांना लोकांना जाहिराती दाखवणं भाग आहे अन्यथा त्यांना आपली कंपनी किंवा आपली वेबसाईट चालवण्याचा खर्चच झेपणार नाही.
अलीकडच्या काळामध्ये आपली माहिती गोळा करून तिचा वापर आणि कित्येकदा गैरवापर करण्यामध्ये अनेक वेबसाईट्स गुंतल्या असल्याचा मुद्दा कळीला आला आहे. माहिती हीच आधुनिक काळामधलं इंधन बनली असल्याचं विधानही अनेक जण करतात. प्रचंड मोठय़ा प्रमाणात माहिती गोळा करून तिचा वापर जाहिराती दाखवणं इथपासून ते आपल्याविषयीचे नेमके अंदाज बांधून आपल्यावर बारीक नजर ठेवणं इथपर्यंत अनेक गोष्टींसाठी केला जाऊ शकतो. सगळ्याच पंपन्या यात सामील असल्या तरी गुगल, फेसबुक यांच्यासारख्या कंपन्या यात एकदम अग्रेसर आहेत. अलीकडच्या काळामध्ये अनेक वेबसाईट्सवर “आम्ही तुमची माहिती गोळा करणार आहोत’’ किंवा “आम्ही पाठवत असलेल्या कुकी स्वीकारण्याला तुम्ही मान्यता देत आहात का?’’ अशा प्रकारचा मजकूर दाखवला जात असल्यामुळे हा सगळा प्रकार नेमका काय आहे हे सर्वसामान्य माणसाला समजणं अवघड झालं आहे.
पहिला मुद्दा इंटरनेटचा वापर लोक कशा प्रकारे करतात हा आहे. इंटरनेट म्हणजे त्यावर सगळं फुकटच मिळणार अशी एक प्रकारची समजूत लोकांच्या मनात रुजली आहे. बातम्यांपासून इ-मेलच्या सुविधेपर्यंत लोकांना सगळं फुकट हवं असतं. गाणी फुकट डाऊनलोड करायची असतात. हे सगळं संबंधित वेबसाईट्सना कसं परवडणार? साहजिकच त्यांना लोकांना जाहिराती दाखवणं भाग आहे. अन्यथा त्यांना आपली कंपनी किंवा आपली वेबसाईट चालवण्याचा खर्चच झेपणार नाही. यातूनच सुरुवातीला सरसकट सगळ्यांना सगळ्याच जाहिराती दाखवायच्या इथून झालेली सुरुवात आता प्रत्येक माणसाला त्याच्या आवडीनिवडीनुसार विशिष्ट जाहिराती दाखवण्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे.
दुसरा मुद्दा जाहिराती दाखवण्यापासून सुरुवात केल्यावर लोकांची माहिती गोळा करण्यासाठीसुद्धा या सगळ्याचा उपयोग होऊ शकतो हे या कंपन्यांच्या लक्षात येण्याचा आहे. यामुळे फक्त जाहिराती दाखविण्यापेक्षा लोकांच्या आवडीनिवडी, त्यांचा मित्रपरिवार, त्यांची निरनिराळ्या विषयांवरची मतं असं सगळं गोळा करून निवडणुका जिंकण्यात/हरण्यात मदत करता येते हे अनेक देशांमध्ये दिसून आलेलं आहे. साहजिकच जसं लोकांना ही माध्यमं फुकट वापरायला आवडतात तसं त्याच्या मोबदल्यात लोकांची माहिती गोळा करणं संबंधित कंपन्यांना आवडतं.
यातून एक तिसराच मुद्दा निघाला. इंटरनेटच्या तंत्रज्ञानामध्ये ‘कुकी’ नावाच्या एका संकल्पनेचा वापर करतात. याचा सोपा अर्थ म्हणजे जेव्हा आपण गुगल क्रोम, फायरफॉक्स किंवा सफारी यांच्यासारखा वेब ब्राऊझर वापरून इंटरनेटवरच्या एखाद्या वेबसाइटला भेट देतो तेव्हा ती वेबसाइट आपल्याला हवं असलेलं पान आपल्या ब्राऊझरकडे पाठवते आणि म्हणून आपल्याला ते पान म्हणजेच वेब पेज आपल्यासमोर दिसतं. याच्या जोडीला ती वेबसाईट आपल्या नकळत त्या पानाबरोबर कुकी नावाच्या छोटय़ा फाईल्ससुद्धा पाठवून देते. या कुकी फाईलमध्ये त्या वेबसाईटनं आपल्याविषयीची माहिती नोंदवलेली असते. अशी निरनिराळी कुकी ही वेबसाईट तिच्याकडे आलेल्या निरनिराळ्या लोकांना पाठवून देते. म्हणजेच उदाहरणार्थ अॅमेझॉनच्या वेबसाईटला एक लाख लोकांनी भेट दिली तर अॅमेझॉन त्या प्रत्येक माणसाच्या संगणकावर स्वतंत्र कुकी पाठवून देईल. साहजिकच पुढच्या वेळी त्यामधल्या कुठल्याही माणसानं अॅमेझॉनच्या वेबसाईटला परत भेट दिली तर त्याची कुकी आता परत अॅमेझॉनकडे जाते आणि तो माणूस नेमका कोण आहे हे अॅमेझॉनला समजतं.
लवकरच या ‘कुकी’ तंत्रज्ञानाचा वापर लोकांची माहिती नोंदविण्याबरोबरच त्यांना नेमक्या कोणत्या जाहिराती दाखवायच्या अशा प्रकारचे निर्णय घेण्यासाठी व्हायला लागला. कारण जर माझ्या विषयीची माहिती समजा गुगलनं माझ्या संगणकावरच्या ‘कुकी’ फाईलमध्ये नोंदवलेली असेल तर मी गुगलच्या वेबसाईटवर कोणकोणती माहिती शोधतो, माझ्या जीमेलमध्ये कोणकोणत्या इ-मेल्स आहेत, यूटय़ूबवर मी काय पाहिलं हे सगळं गुगलला समजू शकतं. साहजिकच माझ्यासाठी नेमक्या जाहिराती दाखवणं गुगलला जमू शकतं. हे इतकी वर्षं घडत होतंच. त्यात फारसं नवं असं काही नाही.
वेबसाईट्सनी आपल्या संगणकावर ‘कुकी’ फाईल पाठवण्यापर्यंतचा प्रकार ठीक होता; पण त्याच्या पुढचं पाऊल मात्र वादग्रस्त होतं. याचं उदाहरण घेण्यासाठी आपण बातम्या दाखवणाऱया एखाद्या वेबसाईटचं उदाहरण घेऊ. समजा आपण अशा वेबसाईटला भेट दिली. आता त्या वेबसाईटवरचा मजकूर वाचत असताना आपल्याला तिथे इतरही अनेक कंपन्यांच्या असंख्य बातम्या किंवा जाहिराती दिसायला लागतात. अशा वेळी आपल्याला बातम्या दाखवणाऱया वेबसाईटची ‘कुकी’ फाईल तर नेहमीसारखी पाठवली जातेच; सोबत सगळ्या जाहिराती दाखवणाऱया कंपन्यासुद्धा त्यांच्या स्वतंत्र ‘कुकी’ फाईल्स आपल्या संगणकावर पाठवून देतात. इथपर्यंत ठीक आहे. आता मात्र आपल्या संगणकावर त्या मूळ वेबसाईटवर जाहिराती झळकवणाऱया सगळ्या कंपन्या आपापल्या त्रयस्थ ‘कुकी’ फाईल्स पाठवून देतात. त्यामुळे त्याही आपला सतत पाठलाग करायला लागतात. समजा वर उल्लेख केलेल्या बातम्यांच्या वेबसाईटवर शर्ट बनवणाऱया एका पंपनीची जाहिरात असल्यामुळे शर्टवाल्या कंपनीची ‘कुकी’ फाईलसुद्धा आपल्या संगणकावर आली. आता समजा या कंपनीनं इतरही काही वेबसाईट्सवर आपली जाहिरात दिलेली असेल आणि त्यापैकी कुठल्याही वेबसाईटवर आपण गेलो तर? आपल्या संगणकावर तिनं आधी म्हटल्याप्रमाणे ‘पुकी’ फाईल पाठवलेली असल्यामुळे या शर्टवाल्या कंपनीला लगेच आपण आता तिनं जाहिरात दिलेल्या दुसऱया वेबसाइटवर गेल्याचं कळतं. म्हणजेच आपल्या नकळत ती आपला पाठलाग करायला लागते. साहजिकच आपण इंटरनेटवर काय बघितलं, शोधलं, खरेदी केलं, कुठे पैसे भरले, कुणाशी संभाषण केलं, कुठे होतो हे सगळं वेगवेगळ्या पंपन्यांना समजायला लागतं.
अभ्यासकांचा आक्षेप या ‘त्रयस्थ पुकी’ प्रकारालाच आहे. कुणीही इंटरनेटवर आपला पाठलाग करत राहावं आणि सतत आपल्यावर लक्ष ठेवून जाहिरातींचा मारा करण्यापासून अक्षरशः आपल्यावर पाळत ठेवल्यासारखी परिस्थिती निर्माण करावी हे सहन होण्यासारखं नाही. म्हणूनच विदेशांमध्ये अनेक दर्जेदार वर्तमानपत्रं, नियतकालिपं यांनी अशा प्रकारच्या ‘त्रयस्थ कुकी’चा वापर थांबवायचं ठरवलं आहे. आता प्रश्न येतो उत्पन्नाचा. ‘त्रयस्थ कुकी’ नाहीत म्हणजे जाहिराती नाहीत आणि जाहिराती नाहीत म्हणजे उत्पन्न नाही, यामुळे या वेबसाईट्सनी सरळ लोकांकडून पारंपरिक पद्धतीनं वर्गणी घ्यायला सुरुवात केली आहे. म्हणजेच लोकांना चांगलं वाचायला, बघायला, ऐकायला हवं असेल तर त्यांनी रास्त दरानं त्याचा मोबदला द्यावा. हे सगळं फुकट मिळेल याची अपेक्षा ठेवू नये. लोकांचा फायदा म्हणजे जाहिरातींचा मारा टळणं आणि काही अंशी तरी त्यांचा इंटरनेटवर होत असलेला पाठलाग बंद होणं. आपल्याकडेही लोकांची मनोवृत्ती लवकरच बदलेल हीच आशा!




























































