
जे मांजरप्रेमी आहेत किंवा जे निसर्ग आणि निसर्गात वावरणाऱया पशू, पक्ष्यांवर प्रेम करतात असे लोक निसर्गपाची माहिती जाणून घेण्यासाठी नेहमीच आतुर असतात. अशाच मांजरप्रेमींना जंगली मांजरींची माहिती मिळावी, त्या मांजरीबाबत जनजागृती व्हावी याकरिता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मांजर कुळातील प्राण्यांची माहिती देणारे भव्य केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रात जाऊन मांजरींची माहिती घेण्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही. आपण या केंद्राला भेट देऊन जंगली मांजरींची इत्यंभूत माहिती जाणून घेऊ शकतो.
मांजर…सर्वांची लाडकी मनीमाऊ, वाघाची मावशी. घरात, दारात, रस्त्यांवर विविध रंगांच्या, आकारांच्या मांजरी दररोज घुटमळताना दिसतात. त्या मांजरींचा मूड, खटय़ाळपणा, प्रेमाने जवळ येणे हे सर्व तसे मजेशीरच असते. पाळीव मांजरींच्या नाना तऱ्हा तर आपण रोजच बघत असतो, पण जंगली मांजरींपासून तसे शहरी लोक लांबच असतात. त्या मांजरींची तितकीशी माहिती फारशी कोणाला नसते, पण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हिच संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकाच ठिकाणी विविध जंगली मांजरींची इत्यंभूत माहिती जाणून घेण्याची पर्वणीच मांजरप्रेमींना मिळत आहे.
नाना तऱहेच्या नाना मांजरी, काही पाळीव तर काही जंगली, पण सर्वसामान्य लोकही केवळ पाळीव मांजरींनाच जाणून असतात. जंगली मांजरींची फारशी कोणाला माहिती नसते. किंबहुना, कोणी त्या मांजरींबाबत माहिती जाणून घेण्याची तसदीदेखील घेत नाही. जे मांजरप्रेमी आहेत किंवा जे निसर्ग आणि निसर्गात वावरणाऱया पशू, पक्ष्यांवर प्रेम करतात असे लोक निसर्गपाची माहिती जाणून घेण्यासाठी नेहमीच आतुर असतात. अशाच मांजरप्रेमींना जंगली मांजरींची माहिती मिळावी, त्या मांजरीबाबत जनजागृती व्हावी याकरिता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मांजर कुळातील प्राण्यांची माहिती देणारे भव्य केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रात विविध दहा जातींच्या जंगली मांजरांचे पुतळे आणि त्या मांजरांची वैशिष्टय़े सांगणारे मार्गदर्शन केंद्र तयार करण्यात आले आहे. या केंद्रात मार्गदर्शनपर तक्ते ठेवण्यात आले आहेत. मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषेत हे तक्ते आहेत. प्रत्येक मांजरीचे वैशिष्टय़, त्याचा स्वभाव आदीची माहिती आपल्याला या केंद्रात मिळते.
वाघ, बिबटे, सिंह हे आपण पाहतोच. या प्राण्यांची माहिती आपल्याला माहीत असते किंवा ती वेगवेगळय़ा माध्यमांतून मिळत असते. त्यांच्या माहितीसह या केंद्रात आपल्याला पाळीव व जंगली मांजरांचीही माहिती मिळते. पाळीव मांजरांना लोक रोजच्या जीवनात पाहत, हाताळत असतात. परंतु जंगली मांजर कशी असते, ती मांजर शिकार कशी करते, त्याचे खाद्य, त्यांचा स्वभाव या बाबींची सहसा कोणाला माहिती नसते. त्यामुळे अशा जंगली मांजरांची माहिती व्हावी, त्या मांजरांबद्दल जनजागृती व्हावी याकरिता राष्ट्रीय उद्यानात हे केंद्र उभारण्यात आले आहे.
मागील वर्षी सुरू झालेल्या या केंद्राच्या तळमजल्यावर या दहा मांजरांच्या प्रतिकृती आणि त्यांची माहिती देणारे फलक दिसतात, तर केंद्राच्या पहिल्या मजल्यावर प्रत्येक मांजरीचा माहितीपट थ्री डी इफेक्टमध्ये पाहायला मिळतो. थ्रीडीच्या माध्यमातून प्रत्येक मांजराचे वैशिष्टय़ जाणून घेताना वेगळाच थरार अनुभवता येतो. यामुळेच मांजरप्रेमी, वन्यप्रेमींसाठी हे केंद्र आकर्षणाचे व अभ्यासाचे केंद्र ठरू लागले आहे.
वन्य मांजरींबरोबर या ठिकाणी स्नो लेपर्ड, ब्लॅक पँथर, आशियाई लायन, लेपर्ड, रॉयल बेंगॉल टायगर यांचेही पुतळे, फोटो आणि त्यांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे, परंतु छोटय़ा जातीच्या जंगली मांजर या केंद्राचे विशेष आकर्षण आहेत. तसेच रस्टी स्पॉटेड कॅट (वाघाटी) ही एक आकर्षक मांजर आहे. म्हणूनच राष्ट्रीय उद्यानात येणारे हजारो वन्यप्रेमी आवर्जून या केंद्राला भेट देतात. विशेष म्हणजे या केंद्रात जाऊन मांजरींची माहिती घेण्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही. आपण या केंद्राला भेट देऊन जंगली मांजरींची इत्यंभूत माहिती जाणून घेऊ शकतो. आता हे केंद्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे महत्त्वाचे अंग ठरू लागले आहे. मांजरप्रेमी, वन्यप्रेमींनी आवर्जून या केंद्राला भेट द्यावी असे आवाहन राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱयांकडून केले जात आहे.





























































