
सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’मध्ये आई मुलाचा वाद टोकाला पोहोचला आहे. तत्त्वनिष्ठ असलेली रत्नमाला आणि वडिलांच्या न्याय हक्कासाठी लढणारा राजवर्धन हे या वादाचे कारण आहे. 20 वर्षांनंतर परत आलेल्या वडिलांना भूतकाळात काही गोष्टींचा सामना करावा लागला होता. याला कारणीभूत होती रत्नमाला. म्हणून आईवर असलेला राग तसेच इतकी वर्षे वडिलांना काय झाले होते, ते कुठे होते? हे रत्नमालाने लपवल्याने अधिक चिडलेला राजवर्धन. रत्नमाला आणि राजवर्धनच्या भांडणात आता माघार कोण घेणार, या सगळय़ा पार्श्वभूमीवर कावेरी कोणाची बाजू घेईल? हे लवकरच मालिकेत समजेल. राजवर्धनने याआधीही कावेरील विचारले होते की, तुला आईची साथ द्यायची की माझ्यासोबत येणार आहेस? त्यामुळे कावेरी नेमका काय निर्णय घेणार, कुटुंब कसे सावरणार हे ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेच्या पुढच्या भागांतून प्रेक्षकांना समजेल.

























































