मॅजिक बॉक्स- सुवर्ण महोत्सवी ‘आमची माती…’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अशोक डुंबरे

 

खास ग्रामीण भागातील शेतकऱयांसाठी सुरू करण्यात आलेला कार्यक्रम म्हणजे  ‘आमची माती आमची माणसं’. उद्या 2 ऑक्टोबर रोजी या कार्पामाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. ‘आमची माती आमची माणसं’ महाराष्ट्रातील गावागावांत हा कार्यक्रम पोहोचला. कार्यक्रमाच्या नावातून आणि शीर्षक गीतेतून शेतकऱयाला साद घातली गेली. हे नाव ग्रामीण लेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी दिले तर याकूब सईद यांनी शांताराम नांदगावकर यांच्याकडून ‘आमची माती…’चे टायटल साँग करून घेतले आणि आजही ते सर्वांच्या कानात घुमत आहे.

खास ग्रामीण भागातील शेतकऱयांसाठी सुरू करण्यात आलेला कार्यक्रम म्हणजे  ‘आमची माती आमची माणसं’. उद्या 2 ऑक्टोबर रोजी या कार्पामाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. 2 ऑक्टोबर 1972 ला मुंबई टीव्ही सेंटर सुरू झाले आणि वरळी येथे 300 मीटरचा मोठा मनोरा प्रक्षेपणासाठी तयार झाला. नंतर एक वर्षाने 2 ऑक्टोबर 1973 ला सिंहगडावरील सहप्रक्षेपण टॉवर म्हणजेच रिले सेंटर सुरू झाले आणि हा कार्पाम खऱया अर्थाने ग्रामीण भागात प्रक्षेपण करण्यासाठी सज्ज झाला. पुण्यातील सहप्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन 2 ऑक्टोबर 73 ला तेव्हाचे केंद्रीय मंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते झाले. त्याच दिवशी मुंबई येथील स्टुडिओतून ‘आमची माती आमची माणसं’ हा कार्पाम आयोजित केला होता आणि निर्माते होते केशव केळकर. मी 1972 ला नवी दिल्ली येथे मंडी हाऊस येथे टेलिव्हिजन ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतले आणि एक जानेवारी 73 ला मुंबई येथे निर्माता म्हणून रुजू झालो.

मुंबई टीव्ही सेंटरचे पहिले केंद्र संचालक पी. व्ही. कृष्णमूर्ती यांना ग्रामीण कार्पामांमध्ये खूप रस होता. सुरुवातीला आठवड्यातील दोन दिवस मंगळवार आणि पावार 20 मिनिटांचा कार्पाम होता. नंतर तो आठवड्यातील तीन दिवस सोमवार, बुधवार, पावार 30 मिनिटांचा झाला आणि 1981 सालानंतर आठवड्यातून पाच दिवस सोमवार ते पावार असा झाला होता. प्रत्यक्षात बघितले तर माणसाला जास्त विश्वास बसतो म्हणून मी ठरवले व आमच्या संचालकांनी पण सांगितलं की, प्रत्यक्ष शेतावर जाऊन कृषी तज्ञांच्या मुलाखती, शेतकऱयांच्या मुलाखती, प्रात्यक्षिक फिल्ड बेस असाव्यात यावर मी कटाक्ष दिला. कार्पामाची तीन महिन्यांची कार्पाम पत्रिका अगोदर तयार करून मान्यता घ्यावी लागत असे. त्याप्रमाणे चित्रीकरणाचे नियोजन केले जात होते. पी. व्ही. के यांनी मला सांगितलं, मी स्वत मुलाखती घ्याव्यात. त्यामुळे इतर निर्मात्यांपेक्षा मला दूरदर्शनच्या पटलावर येण्याची जास्तीत जास्त संधी मिळाली आणि मला लोकप्रियता मिळाली. सुरुवातीला स्वीट विनय धुमाळे माजी सहकारी होते आणि संकलक होते. चंद्रशेखर कामुलकर 1982 पर्यंत फिल्म बेस कार्पामाचे नंतर मग व्हिडीओ कॅमेरे आले आणि चित्रीकरण अधिक सुलभ झाले. 1974 नंतर शशिकांत भोसले, आणखी काही दिवसांनी सर्जेराव चौधरी हे माझे सहकारी होते. 1981 नंतर शिवाजी फुलसुंदर निर्माता म्हणून दूरदर्शन केंद्रात सामील झाले.

ग्रामीण भागात महाराष्ट्र शासनातर्फे प्रत्येक ग्रामपंचायता टीव्ही संच दिलेला होता. करमणुकीचे दुसरे कुठलेही साधन नव्हते. त्यामुळे टीव्ही कार्पाम सर्व स्तरांतील लोक पाहत होते आणि टीव्ही सेंटरला नंतर ‘सह्याद्री वाहिनी’ हे नाव प्राप्त झाले. ग्रामीण भागाप्रमाणे शहरातूनही हा कार्पाम पाहायचे. शेतीतील पिके, अन्नधान्य, फळे, फुले यांची निर्मिती कशी होते हे लोकांना समजायला लागले. पुण्यातील कृषी विद्यापीठात, कृषी महाविद्यालयात तेव्हाचे कुलगुरू माननीय नानासाहेब पवार यांच्या सहकार्याने काम करण्यासाठी एक खोली देण्यात आली. त्यामुळे लोकांशी संपर्क साधण्यासाठी खूप सुविधा निर्माण झाली होती. चार दिवस मुंबईहून आम्ही पुणे येथे येत असू. एक आठवडा पुणे येथे कार्पाम आणि नंतर दुसऱ्या आठवड्यात इतर ग्रामीण भागांत सातारा, नगर, सोलापूर, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी फिरती करून चित्रीकरण करत असू.

कोकण कृषी विद्यापीठ दापोली, रत्नागिरी, वेंगुर्ला इत्यादी भागांत ‘आमची माती…’साठी कार्पाम केले होते. कार्पाम ठरविण्यासाठी एक सल्लागार समिती होती. सर्व ग्रामीण विषयांसंबंधी असणाऱया खातेप्रमुखांमार्फत तसेच कृषी विद्यापीठांमार्फत विषय सुचविले जायचे आणि कार्पाम पत्रिका तयार झाल्यावर त्याची अंमलबजावणी व्हायची. ‘आमची माती…’मध्ये कृषीविषयक तसेच वनीकरण, सामाजिक वनीकरण, फिशरीज, आरोग्य, ग्रामविकास, सहकार याविषयी कार्यक्रम होत असतात.

हा कार्पाम ग्रामीण भागातील शेतकऱयांसाठी होता म्हणून शक्यतो सोप्या भाषेत त्यांना समजेल असा असावा ही धारणा होती. उदाहरणार्थ, खतांचे डोस किती द्यावेत याची आम्ही कॅप्शन किंवा पाटी तयार करत असू. उदाहरणार्थ- नायट्रोजन फॉस्फरस पलाश हे किती द्यायचे? एका पाटीवर वेगवेगळे लिहून शेतकऱयांना समजेल असे तयार करून घेत असू. मग चित्रीकरण केले जायचे. अन्नधान्याची विविध बियाणी शेतकऱयांना ओळखता यावीत म्हणूनही ग्राफिक्सचा वापर करत असू. त्यावेळी प्रत्यक्ष पडद्यावर बघताना शेतकऱयांना ते सहज समजून येत असे. कार्पाम करायचा म्हणजे फिरतीचा प्रवास अनिवार्य होता. आमच्याबरोबर कॅमेरा, कॅमेरा स्टँड, कॅमेऱयाचं हेड साऊंड, रेकॉर्डिंग सामान असं भरपूर सामान असायचं. जीपमध्ये प्रवास करताना निम्मी जीप सामानाने भरून जायची. कारण प्रत्येक खात्याकडे बहुधा जीप हेच साधन असायचे. नंतर गाड्या वगैरे आल्या. मला आठवते, सुरुवातीला आम्ही सामान बैलगाडीतूनसुद्धा नेले आहे.

गणेशखिंड येथे विभागीय फळ संशोधन केंद्र आहे. तेथे माझे मित्र मधुकर देसाई हे इन्चार्ज होते. ते मला चित्रीकरणाच्या आदल्या दिवशी त्यांची बैलगाडी आणि माणूस कृषी महाविद्यालयाच्या ऑफिसपाशी पाठवत असत. सकाळी मी, यशवंत कडोलकर आठ वाजता चित्रीकरणासाठी बैलगाडी, ट्रक्टर, ट्रक, बस, होडी, बोट या सर्वांचा अनुभव आम्ही घेतला. एकदा बीपी सिंह (कॅमेरामन) मला म्हणाला, कामगार विश्व या कार्पामासाठी त्या निर्मात्याने टीव्ही स्टारला विमानप्रवास घडवला होता. आपण एकदा करा. मग  माझे मित्र अभय फडके एका पेस्टिसाइड कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी होते. त्यांनी त्यांच्या कंपनीमार्फत आम्हाला बंगळुरू येथे विमानाने नेले. त्या वेळी माझ्या बरोबर बीपी सिंग, शशिकांत भोसले, कामुलकर, सांगवेकर होते.

नियमित कार्पामाच्या बरोबर इतरही कार्पाम ‘आमची माती…’तर्फे आयोजित केले होते. 1980 मध्ये कृषी आणि दूरदर्शन परिसंवाद कृषी महाविद्यालय, पुणे आणि दूरदर्शनतर्फे पुण्यात आयोजित केला होता. यावेळी चारही विद्यापीठांचे कुलगुरू, कृषी खात्याचे आयुक्त, 50 ते 60 शेतकरी उपस्थित होते. दूरदर्शनच्या माध्यमातून नवीन कृषी तंत्राचा वापर करून कृषी उत्पन्न कसे वाढवता येईल असा याचा उद्देश होता.

25 नोव्हेंबर 1980 रोजी मुंबई दूरदर्शन केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या सहकार्याने कृषी महाविद्यालय, पुणे येथे ट्रक्टर नांगरणीच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्याचे उद्घाटन तेव्हाचे पोलीस आयुक्त एस.जी सहस्रभोजने यांनी केले होते. त्याप्रसंगी पुणे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक प्रतापचंद्र दुदुस्कर उपस्थित होते. या स्पर्धेत दहा शेतकऱयांनी भाग घेतला होता. फोर्ड एस्कॉर्ट इंटरनॅशनल आणि किर्लोस्कर या कंपनीचे ट्रक्टर सामील झाले होते. 1980 च्या दरम्यान केंद्र संचालक अरुण सराफ यांच्या संकल्पनेतून शेतकऱयांसाठी दुग्ध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याचे नियोजन महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने काटेकोरपणे केले होते. पुणे जिह्यातील संकरित गोपालक या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ पुण्यातील कृषी महाविद्यालयात संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून तेव्हाचे पशुसंवर्धन मंत्री माननीय शिवाजीराव निलंगेकर पाटील उपस्थित होते. तसेच माझे मित्र, माजी खासदार किसनराव बाणखेले आवर्जून उपस्थित होते. स्टेट बँक ऑफ इंडिया, पुणे विभाग यांनी विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके दिली होती. शेतकऱयांचा सहभाग तसेच गोपालकांना प्रोत्साहन देण्याचा हा एक यशस्वी प्रयत्न होता.

कृषी उत्पादनात सिंचन व्यवस्थेला खूप महत्त्व आहे हे जाणून मी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी येथील सिंचन प्रकल्पावर एक लघुपट केला होता. त्यावेळी माझे मित्र विजय परुळेकर यांनी सहाय्य केले होते. हा कार्पाम प्रक्षेपित झाल्यानंतर राळेगणसिद्धीला अनेक शेतकऱयांनी भेटी दिल्या आणि माहिती करून घेतली. काही गावांनी असा प्रकल्प राबवला असं मला नंतर कळलं, पण अण्णांना खूप त्रास झाला. कारण सारखे लोक पहायला यायचे. संभाजीनगर जिह्यातील विजय बोराडे यांनी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ याचा एक प्रयोग केला होता, तो यशस्वी झाला होता. त्यावर मी कार्पाम केला होता. लोकांना तो भावला तसेच निसर्गकवी ना. धों. महानोर मुक्काम पोस्ट पळसखेडे येथेही जाऊन मी कार्पाम केला होता. कमी पाण्यात ठिबक सिंचन वापरले तर माळरानावरही नंदनवन होऊ शकते हे त्यांनी सिद्ध केले होते. माळरानावरही त्यांनी आपल्या सीताफळ, डाळिंब इत्यादीच्या फळबागा उत्तमरीत्या जगवून, टिकवून दाखवल्या होत्या. माननीय पु. ल. देशपांडे यांनी तेथे जाऊन त्यांचे कौतुक केले होते. तसेच पुरंदर तालुक्यातील विलासराव साळुंखे यांनी पाणी पंचायत म्हणजेच ‘समान पाणी वाटप’ याचा एक प्रयोग यशस्वी करून दाखवला होता. त्यावर एक कार्पाम केला. कमी पावसाच्या भागातील लोकांसाठी हा कार्पाम उपयुक्त होता.

पश्चिम महाराष्ट्रातील अनेक तीर्थक्षेत्रातील यात्रा लोकांना घरबसल्या पाहता याव्यात, देवदर्शन व्हावे म्हणून मी त्यावरही कार्पाम केले. हे एक मोठं समाधान मिळवून गेलं. एकूण जवळ जवळ 19 वर्षे ‘आमची माती आमची माणसं’ या कार्पामाची निर्मिती केली. त्यात अनेक शेतकरी कृषी तज्ञ सामाजिक कार्यकर्ते, पुढारी, मंत्री यांनी खूप मदत केली. शेतकऱयांची या माध्यमातून मला मनोभावे सेवा करता आली हे मी माझे परमभाग्य समजतो.

(लेखक माजी दूरदर्शन निर्माते आहेत.)