अनुवाद दिनानिमित्त…

>> संजीवनी धुरी-जाधव

आज जागतिक अनुवाद दिन. अनुवादाची कला. एक सर्वांगसुंदर प्रकार. जगभरातील विविध अपरिचित भाषांतील साहित्य आपल्याला आपल्या मातृभाषेत वाचायला मिळते. विविध भाषांचे एकमेकांशी सूर जुळतात. सध्याच्या मर्यादित वावराच्या काळात या अनुवाद कलेने अनेक गोष्टी साध्य होतात… याबाबत ज्येष्ठ लेखिका आणि अनुवादक उमा कुलकर्णीयांच्याशी साधलेला संवाद.

अनुवादाची सध्याची गरज ही वैयक्तिक आहे. एकोणिसाव्या शतकातही एक भाषांतर युग येऊन गेलं. त्यावेळेला कादंबरी, कथा, कविता हे फॉर्म आकाराला येत होते. इंग्रजीमधून जे अनुवाद आले त्यामधून आपले हे आकार रूढ होत गेले म्हणजे एकोणिसाव्या शतकात हे अनुवाद, भाषांतर ही साहित्यिक गरज होती. विशेषकरून एकविसाव्या शतकात ती वैयक्तिक गरज बनलेली आहे. म्हणजे साक्षरता वाढलेली आहे, वाचक वाढलेला आहे आणि तो बहुश्रुत, हुशार वाचक आहे. त्याला त्याच्या आकलनाच्या दृष्टीने एकाच भाषेतील साहित्य फार लवकर संपल्यासारखे वाटते. पण तुम्हाला वेगळं क्षितिज दाखवणारं वेगळ विस्तारलेलं साहित्य अनुवादातून यायला लागतं. त्यामुळे असं म्हणू शकतो आपणं की, आजची गरज साहित्यिक नाही आहे. ही वैयक्तिक वाचकाची गरज आहे. त्यामुळे आज कधी नव्हे तेवढे अनुवादाला महत्त्व प्राप्त झालेले आहे. एक एक वाचक त्याला भिडतोय. प्रत्येक वाचकाला त्याचं क्षितिज विस्फारून पाहायचे आहे. ते त्याला अनुवादातून मिळतं.

मी आणि माझा अनुवाद हे एकच झालेले आहोत. माझं दोन-तीन वर्षांपूर्वी ‘संवादु अनुवादु’ हे आत्मकथन प्रकाशित झालेलं आहे. मेहेता पब्लिकेशनने ते प्रकाशित केलेलं आहे. मी कवयित्री वगैरे कोणी नाहीय. मी वाचक आहे आणि मला उत्तम साहित्याची आस आहे, उत्तम वाचायला आवडतं. त्यातून कन्नडमधील आवडलेली किंबहुना चांगली वाटलेली कलापृती अनुवाद करायला लागले. अनुवाद हा अतिशय महत्त्वाचा आहे. अनुवादाद्वारे तुम्हाला वेगवेगळ्या प्रदेशातला, भूप्रदेशातला माणूस समजत जातो. हल्ली प्रवास खूप केले जातात. त्याद्वारे आपल्याला तिथला माणूसही त्या साहित्याद्वारे कळलेला असल्याने आपल्याला तिथे जाताना जवळीक वाटते. अनुवाद दुहेरी अनुभव देतो, एक म्हणजे ही सगळी पण माणसेच आहेत आणि दुसरं म्हणजे माझ्यापेक्षा ज्यांचे आयुष्य यापेक्षा वेगळं आहे आणि तरीही ती माणसंच आहेत. त्यामुळे मला स्वतःला वाटतं की अनुवादित साहित्य जीवनाचं क्षितिज विस्तारत जातं.

चांगले भाषांतर कशाला म्हणता येईल

चांगलं भाषांतर मी मानते की, मूळ कलापृतीचा फिल पाहिजे. ती कलापृती दक्षिण कन्नड जिह्यात, जर्मनीत घडत असेल तर तो फिल त्या कलापृतीने दिलाच पाहिजे. पण वाचणारा वाचक आपला आहे, इथला मराठीतला आहे, वाचताना, ते त्याच्या गळी उतरवताना त्याला अडथळे येता कामा नये. कारण अडथळे आले की तो पुस्तक बाजूला सारतो आणि तुम्हाला जे अपेक्षित क्षितिज विस्तारण्याची प्रक्रिया आहे ती त्याच्या बाबतीत होऊ शकत नाही. म्हणून सोपं करायची पण गरज नाही. थोडसं प्रयत्नाने अनुवाद हा केवळ स्वांतसुखाय करायची गोष्ट आहे असं मी मानत नाही. कारण एक एक कलापृतीसाठी मी माझ्या आयुष्यातले दोन-दोन, सहा-सहा महिने दिलेले असतात. त्यामुळे माझा जो अनुभव आहे तो मला माझ्या वाचकांपर्यंत पोहोचवायचा आहे. माझा उद्देश तोच असतो की या माणसांना कर्नाटक पण समजायला पाहिजे, पण ते समजण्यासाठी हे पुस्तक शेवटपर्यंत वाचायला हवे.

अनुवादासाठी काय काय करणं गरजेचं असतं

मी जास्त करून ललित साहित्य अनुवाद करते. जे काही निरीक्षण आहे ते ललित साहित्यातले आहे. मला त्याबाबतीत अगदी प्राथमिक गरज आहे ती म्हणजे दोन भाषांवर प्रभुत्व ज्यातून तुम्हाला करायचे आहे. या प्रभुत्वासाठी डिक्शनरीची मदत घेता येते किंवा काही वेळेला दोहीभाषिक मित्र असतील त्यांची मदत घेऊ शकता. त्यातही तुम्ही ज्या भाषेत मांडणार आहात त्या भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. ज्या भाषेतून समजून घेणार आहात तिथे तुम्हाला मदत करायला अनेकजण असतात, लेखक हयात असेल तर त्याच्याशी संवाद साधू शकता. पण ज्या भाषेत मांडायचे असते ती भाषा मात्र कमवायची असते. ती भाषा प्रभावी असणे गरजेचे असते. भैरप्पा अनुवादित करताना, शिवराम कारंथ अनुवादित करताना, गिरीश कर्नाड अनुवादित करताना, या प्रत्येकाची शैली वेगवेगळी असते. त्यामुळे तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्रेस करताना तुमच्या भाषेवर तेथे मशागत लागते. यामुळे मराठीचे वाचन परफेक्ट लागते. मराठीतला तुमचा अभ्यास जास्त असावा लागतो. ललित साहित्याच्या बाबतीत माझे स्वतःचे म्हणणे असे आहे की, आता एक कादंबरी तो लेखक लिहितो पण त्याच्यामागे त्याची एक फिलॉसॉफी असते. त्याद्वारे तो आपले विचार व्यक्त करत असतो. त्यामुळे मी म्हणेन तर अनुवाद करण्यापूर्वी लेखक हयात असतील तर त्या लेखकाशी संवाद साधा. तो तुम्ही कसा साधता हा तुमचा प्रश्न आहे. मी तर त्या लेखकाच्या घरीच जाऊन धडपून येते. बघते की तो माणूस कसा जगतो? मोठमोठय़ा स्त्राrवादी भूमिका मांडणारा लेखक घरी आपल्या बायकोशी कसा वागतो? मी अनुवादिका आहे. मी घरी आल्यावर त्याचं माझ्याबरोबर वागणं कसं आहे? मी असताना आणखी चारजण तेथे आले तर त्यांच्याशी तो कसा वागतो? हे एक थोडं फिलिंग कळलं की तो जी फिलॉसॉफी मांडतो, त्यात त्याला काय म्हणायचं आहे ते तुमच्या लक्षात येतं. लेखक कितीही मोठा असला तरी त्यालाही शब्दांतूनच व्यक्त व्हायचं असतं. त्याला त्याच्या शब्दांना काही मर्यादा आलेल्या असल्या तरी अनुवादकासमोर त्या मर्यादा नसाव्यात. लेखकाला नेमपं हे म्हणायचंय ते बिटवीन द लाइन्स मला अनुवादिका म्हणून लिहिता आलं पाहिजे. यामुळे कलापृती आपल्यालाच उलगडत जाते.

कन्नड भाषेतून तुम्ही बरेच अनुवाद केले आहेत. त्याबद्दलचा तुमचा एखादा अनुभव सांगा

– कन्नड भाषेतून मी केलेले मराठीतले अनुवाद खूप वाचले गेले आहेत. कारण प्रकाशकाकडून त्या पुस्तकाच्या किती आवृत्त्या गेल्या ते मला कळते. वाचकांनी ते उचलूनही धरले आहेत. त्या पुस्तकांवर परिचयात्मक, समीक्षणात्मक लेखनही झाले आहे. म्हणजे विद्वानांनीही त्याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. शासनाचे काही पुरस्कारही मिळाले आहेत. म्हणजे राजमान्यताही झाली. या दृष्टीने मला महाराष्ट्रातल्या वाचकांचं काwतुकही वाटतं. एकवेळ सीमा प्रश्नावरून ते भांडतीलही, पण कन्नड पुस्तकाचा अनुवाद ते नाकारत नाहीत. हे मराठी माणसाच्या मनाचं मोठेपण आहे, त्याचं मला काwतुक वाटतं. असे मला कितीतरी अनुभव येतात. तिकडच्या, म्हणजे कर्नाटकातल्या मोठमोठय़ा लेखकांनाही आपलं साहित्य मराठीत जावं असं फार वाटतंय.

उद्या जागतिक अनुवाद दिन आहे. काय सांगाल वाचकांना…

– अलीकडे वेगवेगळ्या भाषांतली माहितीपूर्ण पुस्तपं अनुवादित होऊन येतात. ती वाचलीही जातात. कारण कदाचित वाचकाचीही ती तत्कालिक गरज असते. पण इतर भाषांतील ललित साहित्यही तुम्हाला माणूस म्हणून घडवू शकते. एखादे पुस्तक क्रांती करू शकेल असे मला वाटत नाही, पण वैयक्तिकरीत्या तुमच्या मनात काही गंड असतील तर एखादी कलापृती वाचून तुमच्या मनातील तो गंड नाहीसा होऊ शकतो. तुमच्या मनातील सेन्सिव्हिटी हे ललित साहित्य जागृत करते हे नक्की.

आपली प्रतिक्रिया द्या