
रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याची तयारी केली असून युद्धाला कोणत्याही क्षणी तोंड फुटू शकते असे वृत्त आहे. दरम्यान, रशियाने आज क्षेपणास्त्र्ा चाचण्या करून अण्वस्त्र्ा अभ्यास सुरू केला आहे. तर दुसरीकडे रशियाचा पाठिंबा असलेल्या फुटीरवाद्यांनी युक्रेनच्या 20 ठिकाणांवर रॉकेट डागले.
गेल्या काही दिवसांपासून रशिया-युक्रेनमधील तणाव कमालीचा वाढला आहे. युक्रेनच्या तीन सीमांवर दीड लाखांवर रशियन सैनिक सज्ज आहेत. लढाऊ विमाने, युद्धनौका तैनात केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी व्रेमलिन सीमेवरून रशियाने आपले सैन्य मागे घेतल्याचे वृत्त होते. मात्र अमेरिकेला यावर विश्वास नाही. त्यातच आज रशियाने जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या आणि क्रुज क्षेपणास्त्र्ाांच्या चाचण्या केल्या. अण्वस्त्र्ा अभ्यासही सुरू केला आहे. दरम्यान, रशियन सैनिक युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतात, असे अमेरिकेचे लष्करप्रमुख लॉईड ऍस्टिन यांनी म्हटले आहे.
पुतीन हल्ला करणार – बायडेन
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनची राजधानी क्यीववर ते पहिला हल्ला करतील. 28 लाख जनतेच्या जिवाशी ते खेळत आहेत. याचे गंभीर परिणाम रशियाला भोगावे लागतील, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे.
जर्मनी, फ्रान्सने युक्रेनमधील उच्चायुक्तालयात अडकलेले कर्मचारी, नागरिक हलविण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी खास विमाने पाठविली आहेत.
हिंदुस्थानींना आणण्यासाठी ‘एअर इंडिया’ची विमाने जाणार
युक्रेनमध्ये अनेक हिंदुस्थानी अडकले आहेत. त्यात 18 हजार ते 20 हजार मेडिकल आणि इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. युद्धाच्या तणावामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत.
या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी पुढील आठवडय़ात 22, 24 आणि 26 फेब्रुवारीला एअर इंडियाची तीन विमाने युक्रेनला जाणार आहेत. त्यासाठी बुकिंग सुरू केले आहे.



























































