
>> अशोक डुंबरे
‘आमची माती आमची माणसं’ हा कार्यक्रम करताना यात सणवार, यात्रा, उरूस, तीर्थक्षेत्र इत्यादींचा आवर्जून समावेश केला जात असे. यानिमित्त महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या धाराशीव जिल्ह्यातील श्री क्षेत्र तुळजापूर येथील भवानी माता मंदिर व करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर या दोन्ही मंदिरांचे अनेक उत्सव व सोहळय़ांचे चित्रीकरण करता आले.
दूरदर्शन कारकीर्दीला मी 1973 मध्ये आरंभ केला. निर्माता म्हणून ‘आमची माती आमची माणसं’ हा कार्पाम ग्रामीण भागातील शेतकऱयांसाठी सुरू करण्यात आला. या कार्पामाचे दर्शक ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार असे होते. या कार्पामात सणवार, यात्रा, उरूस, तीर्थक्षेत्र इत्यादींचा आवर्जून समावेश करण्याचे मी ठरविले होते. धाराशीव जिह्यात श्री क्षेत्र तुळजापूर येथे भवानी मातेचे मंदिर आहे. हे क्षेत्र पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती म्हणजेच भवानी म्हणून प्रसिद्ध आहे. ती महाराष्ट्राच्या तेजाची स्फूर्तिदेवता, प्रेरणाशक्ती मानली जाते. स्वराज्य संस्थापक राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आराध्य देवता आहे. श्री भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे.
ग्रामीण भागातील लोक धार्मिक असतात. बऱयाच ग्रामीण भागातील लोकांचे कुलदैवत भवानी माता आहे. त्यांची आपल्या दैवतावर गाढ श्रद्धा असते. ‘आमची माती आमची माणसं’ या कार्पामात फक्त शेतीविषयक कार्यक्रम न करता जत्रा, उरूस, तीर्थक्षेत्र यांचे चित्रीकरण करून लोकांना घरबसल्या दाखवावे म्हणून मी हा प्रयत्न केला होता. 1974 साली नवरात्रदरम्यान तुळजापूर येथे कॅमेरामन, साऊंड रेकॉर्डिंग, लाइटिंग असिस्टंट यांच्याबरोबर भवानी देवीची वारी केली होती. त्या वेळी माणिकराव पाटील हे तुळजाभवानीचे पुजारी होते. त्यांची माझी आधीपासून ओळख होती. त्यामुळे तेथील वास्तव्यात शूटिंग करणे सोपे झाले. आमच्या टीमचा मुक्काम पाटलांच्या वाडय़ात होता. पाटलांचा वाडा देवीच्या देवळासमोरच होता. माणिकराव पाटील मुख्य पुजारी असल्यामुळे त्यांच्या सल्ल्यानुसार चित्रीकरणाची आखणी केली. सकाळची, दुपारची आरती, महानैवेद्य या सगळय़ा विधींचे व्यवस्थित चित्रीकरण करता आले.
देवीच्या देवळात प्रवेश केल्यावर पहिल्यांदा कुंड आहे, तेथे लोक देवळात जाण्याअगोदर स्नान करतात. पुढे गेल्यावर एक दरवाजा लागतो. तेथून देवीचा मंदिर परिसर दिसतो. डाव्या हाताला मंदिराच्या व्यवस्थापनेचे ऑफिस आहे. तेथे लोक आपल्या मर्जीप्रमाणे पावत्या रीतसर फाडतात. येथे अभिषेकाच्या रकमेची पावती मिळते. अभिषेकाची घाई नसेल तर योग्य वेळी अभिषेक करून भाविकाला प्रसाद घरपोच पाठवला जातो. काही लोक नवस फेडण्यासाठी आवारामध्ये स्नान केल्यानंतर लोटांगण घालतात अशी दृश्ये कॅमेऱयामध्ये टिपली होती. भाविकांच्या नवरात्र दर्शनासाठी मोठय़ा रांगा लागलेल्या असतात. काही भाविक नवरात्रीमध्ये उपवास करतात. काही भाविक पायात चपला न घालता अनवाणी फिरत असतात. कारण त्यांची देवीवर खूप मोठी श्रद्धा असते. आमच्या वास्तव्यात भाविकांच्या मुलाखती, देवीचे अनुभव इत्यादींचे रेकॉर्डिंग केले होते. दोन-तीन दिवसांच्या मुक्कामात भरपूर चित्रीकरण केले होते.
1984 सालापर्यंत आमचे चित्रीकरण फिल्म बेस होते. सगळी फिल्म प्रोसेसिंग करून साऊंड मॅग्नेटिक ट्रकवर ट्रान्सफर करून नंतर एडिटिंग केले जायचे. चंद्रशेखर कामुलकर नेहमीचे एडिटर होते. कार्पामाला योग्य ते निवेदन, बॅकग्राऊंड म्युझिक, ओरिजनल साऊंड इफेक्ट वापरून कार्पामाचे आर आर करून एवढी मेहनत घेतल्यावर तो प्रसारित केला जायचा. माझा हा पहिला कार्पाम चांगला होता. दर्शकांना तो खूप आवडला. माझ्या वीस वर्षांच्या निर्मितीच्या कारकीर्दीत मी निदान पाच ते सहा कार्पाम नक्कीच केले असतील त्याचे एक सात्त्विक समाधान मिळाले. देवीची एक प्रकारे सेवा करता आली हे मी माझे भाग्य समजतो.
कोल्हापूरच्या मंदिराचा कधी अंबाबाई, तर कधी महालक्ष्मी असा उल्लेख केला जातो. करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी आहे. मूळ आदिमाया त्रिगुणात्मक स्वरूपातील भगवती महालक्ष्मीचे मंदिर आहे, पण आजही कोल्हापूर अंबाबाईचे मंदिर असाच उल्लेख केला जातो. मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजा कर्णदेव याने इसवी सन 634 मध्ये केले होते. मुगल कारकीर्दीत या मंदिराचा विध्वंस केला होता, परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. देवीची मूर्ती दगडी असून मूर्तीवर सिंह आहे, डोक्यावर मुकुट आहे, त्यावर नागमुद्रा आहे. जागृत देवस्थान, नवसाला पावणारी देवी म्हणून इथे बाराही महिने विशेषत पावार-मंगळवार भाविक जास्त संख्येने येतात. नवरात्रातील नऊ दिवस देवीची वाहन पूजा बांधतात. अष्टमीला देवीची नगर प्रदक्षिणा होते. नवसाप्रित्यर्थ देवीचा जोगवा मागण्याची प्रथा आहे. अश्विन महिन्यात व्रत करण्याची प्रथा आहे. देवीसमोर फेर धरून घागरी फुंकायच्या असतात. वर्षातून तीन वेळा उत्सव साजरे केले जातात. एक चैत्र पौर्णिमेचा उत्सव, दुसरा अश्विन पंचमीचा उत्सव आणि तिसरा जानेवारी-फेब्रुवारीत अंबाबाईचा किरणोत्सव असतो. सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरण गाभाऱयामध्ये अंबाबाईच्या मूर्तीवर पडतात हे पाहायला असंख्य भाविक जमा होत असतात.
दूरदर्शनच्या कारकीर्दीत कोल्हापूरला अनेक वेळा गेलो होतो. त्या वेळी खास नवरात्रामध्ये चित्रीकरण करण्यासाठी थांबण्याचा योग आला होता. अंबाबाईच्या देवस्थान कमिटीतर्फे आम्हाला सर्वतोपरी सहकार्य करण्यात आले. एकदा तर गाभाऱयात जाऊन शूटिंग करण्यास परवानगी दिली. माझ्या आठवणीप्रमाणे श्रीकांत पुराणिक हा कॅमेरामन होता. माझे आकाशवाणीमधील स्नेही मधुकरराव कुलकर्णी यांना सोवळे नेसून गाभाऱयात प्रवेश दिला होता. एका चैत्र पौर्णिमेला शूटिंग करण्याचा योग आला. अश्विन पंचमीला कोल्हापूरपासून दूर असलेल्या टेंबलाई मंदिरात महालक्ष्मीच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येते. अशी अनेकदा चित्रीकरण करण्याची संधी मिळाली. सुरुवातीच्या काळात फिल्मबेस ब्लॅक अॅण्ड व्हाइटनंतर व्हिडीओ कॅमेरे प्रत्यक्ष 1984 नंतर फिल्डवर नेता आले. त्यामुळे रंगीत कार्पाम दूरदर्शनच्या माध्यमातून जनमाणसांत दाखविण्याची संधी मला मिळाली होती. विशेष म्हणजे 1992 पर्यंत सह्याद्री वाहिनी ही एकमेव वाहिनी होती. चित्रीकरण करताना भाविकांचा, प्रेक्षकांचा, व्यवस्थापकीय मंडळींचा अडथळा आला नाही. सगळय़ांच्या सहकार्याने कार्पाम तयार करणे हे टीमवर्क असते. सगळय़ांचे हात लागतात म्हणून कार्पामाची निर्मिती होते, हे एकटय़ाचे श्रेय नसते. सुदैवाने मला सहकारी चांगले भेटले म्हणून हे काम मी लोकांपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचवू शकलो.
(लेखक माजी दूरदर्शन निर्माते आहेत.)




























































