Asian Games 2018 – मनजीत सिंगची ‘सुवर्ण’धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जकार्ता

जकार्तामध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानला आणखी एक सुवर्णपदक मिळाले आहे. मंगळवारी झालेल्या पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत मनजीत सिंगने सुवर्ण दौड लगावली. तर याच स्पर्धेत हिंदुस्थानच्या जिनसन जॉन्सने रौप्य पदक जिंकून इतिहास घडवला. यासह हिंदुस्थानच्या खात्यात नऊ सुवर्णपदकांची नोंद झाली आहे.

मंगळवारी झालेल्या पुरुषांच्या 800 मीटर फायनल स्पर्धेत मनजीत सिंगने 1 मिनिट 46.15 सेकंदाची नोंद करत सुवर्णपदक जिंकले. तर जॉन्सनने ही शर्यत 1 मिनिट 46.35 सेकंदात पूर्ण करत रौप्य पदक जिंकले. अॅथलिटिक्समध्ये एकाच वेळी सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावण्याची कामगिरी 1962 नंतर पहिल्यांदाच घडली आहे.