
पाकिस्तानच्या भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते असिफ अली झरदारी यांना पार्क लेन आणि थाटा जलापूर्ती प्रक्रांणत प्रकरणी दोषी ठरवले आहे.
त्यांच्यासह अन्य 19 आरोपींवर या प्रकरणात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. याच न्यायालयाने गेल्या आठवडय़ात झरदारी आणि त्यांची बहीण फरयाल तालपूर यांनाही मेगा मनी लॉण्डरिंग प्रकरणात दोषी ठरवले होते. गेल्या वर्षी पाकिस्तानच्या राष्ट्रीय जबाबदेयी ब्युरोने झरदारी यांना अटक केली होती; पण प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्यांची उपचारासाठी मुक्तता करण्यात आली होती.





























































