भर पावसात भिजत ड्युटी करणाऱ्या वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गुवाहटी

आसामची राजधानी गुवाहटीला शनिवारी वादळी वाऱ्याने झोडपून काढले. अशा वादळी पावसात भिजत ड्युटी करणाऱ्या एका ट्राफिक पोलिसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिथून दास असे त्या पोलिसाचे नाव असून त्याच्या कर्तव्यदक्षतेला लोकांनी सलाम ठोकला आहे.

मिथून दास यांना शनिवारी बसिस्ता मार्गावर ड्युटी लावण्यात आली होती. या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मिथूनदास यांची ड्युटी संपायच्या काही वेळ आधीच पाऊसाला सुरुवात झाली. मात्र मिथूनदास यांच्या जागी येणारा पोलीस वेळेवर न आल्याने ते अर्धातास पावसात भिजत ड्युटी करत राहिले. ‘पावसात भिजत ड्युटी करणं थो़डं कठिण होतं मात्र माझ्यासाठी ड्युटी महत्त्वाची आहे त्यामुळे मी माझी जागा सोडली नाही’, असे मिथून दास यांनी सांगितले.