
देशातील आघाडीची एसएफबी बँक असलेल्या एयू स्मॉल फायनान्स बँकेने (एयू एसएफबी) यंदाच्या सणासुदीच्या हंगामासाठी ‘हार्ट टू कार्ट’ शॉपिंग फेस्टिव्हल मोहिमेअंतर्गत आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे. एयू एसएफबीने एयूच्या क्रेडिट कार्ड्स आणि डेबिट कार्ड्ससाठी ही खास शॉपिंग ऑफर आणली आहे. ही ऑफर येत्या 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2023 या कालावधीसाठी राहणार आहे. मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, घरगुती उपकरणे, खाद्यपदार्थ आणि किराणा, मनोरंजन, प्रवास, आरोग्य, ग्राहकपयोगी वस्तू, फर्निचर आणि वस्तू खरेदीसाठी ईएमआय आदींसाठी विविधांगी श्रेणीतील अनेक आघाडीच्या व्यापार कंपन्यांच्या साथीने या अनोख्या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.
एयू एसएफबीच्या ‘हार्ट टू कार्ट’ शॉपिंग फेस्टिव्हलचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते सर्व प्रमुख ई-रिटेलर मंचावरील शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये आकर्षक ऑफर देत आहे. एयू एसएफबीच्या योजनेमध्ये 30 पेक्षा जास्त दिग्गज ब्रँडचा सहभाग आहे. नवरात्री आणि दसऱ्यासाठी, एयू एसएफबीने आजपासून नऊ दिवसांच्या कालावधीसाठी खरेदीचा धुमधडाका सादर केला असून त्यात खालील ऑफर्सचा समावेश आहे:
– स्विगी ऑर्डर आणि स्विगी इन्स्टामार्टवर 200 रुपयांची सवलत
– टाटा क्लिकवर 20 टक्के सवलत (1,000 रुपयांपर्यंत).
– ब्लिंकीटवर 20 टक्के सवलत (200 रुपयांपर्यंत).
– झोमॅटो ऑनलाईन ऑर्डर आणि भोजनासाठी 20 टक्के सवलत
– बुकमायशोवर बाय वन गेट वन ऑफर (250 रुपयांपर्यंत)
-यात्रा आणि ईझीगो(ixigo) च्या माध्यमातून देशांतर्गत हवाई प्रवासासाठी 15 टक्के सवलत (3000 रुपयांपर्यंत) तर आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी 10 हजार रुपयांपर्यंत सवलत
– गोस्टोअर डॉट कॉमवर 10 टक्के सवलत (2000 रुपयांपर्यंत)
– सणासुदीच्या काळात ग्राहक एयू0101 अॅपवर नोंदणी केलेले रिचार्ज, बिल पेमेंट, गिफ्ट कार्ड आणि बस तिकिटांवर आकर्षक ऑफरचा लाभ घेऊ शकतात.


























































