मिचेल मार्श, ट्रेव्हिस हेडची अर्धशतके ऑस्ट्रेलिया ‘अ’6 बाद 290 धावा

13

सामना ऑनलाईन । बंगळुरू

पहिल्या चारदिवसीय कसोटीत विजय मिळवणार्‍या ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने शनिवारपासून येथे सुरू झालेल्या हिंदुस्थान ‘अ’ संघाविरुद्धच्या दुसर्‍या चारदिवसीय कसोटीच्या पहिल्या दिवशी 6 बाद 290 धावा तडकावल्या. मिचेल मार्शच्या नाबाद 86 धावा आणि ट्रेव्हिस हेडच्या 68 धावा हे आजच्या दिवसाचे वैशिष्टय़ ठरल्या. रजनीश गुरबानी याने मॅट रेनशॉला शून्यावरच बाद करीत मोठा धक्का दिला, पण त्यानंतर कर्टीस पॅटरसन (48 धावा) व ट्रेव्हिस हेड (68 धावा) यांनी 92 धावांची भागीदारी करीत डाव सावरला. दोघे बाद झाल्यानंतर अष्टपैलू मिचेल मार्शने 13 नेत्रदीपक चौकारांसह नाबाद 86 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

आपली प्रतिक्रिया द्या