Honda Amaze चा स्पेशल एडिशन हिंदुस्थानात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Honda Cars India Limited (HCIL) ने हिंदुस्थानात आपल्या Amaze कारचा स्पेशल एडिशन लॉंच केला आहे. फेस्टिव्ह सीजनला लक्षात घेऊन हा स्पेशल एडिशन कंपनीने लॉन्च केला आहे. आज आम्ही तुम्हाला याच कारच्या फीचर्स आणि किंमत बद्दल माहिती सांगणार आहोत.

Amaze च्या या स्पेशल एडिशन पेट्रोल व्हेरिेएंटची किंमत हिंदुस्थानात 7 लाख रुपये आहे. तर याच्या डिझेल व्हेरिेएंटची किंमत 9.10 लाख रुपये इतकी आहे. यात डिजीपॅड 2.0 – 17.7 सेमी टचस्क्रीन अ‍ॅडव्हान्स डिस्प्ले, ऑडिओ सिस्टम, स्लीक -स्ट्राइकिंग बॉडी ग्राफिक्स आणि स्पेशल सीट कव्हर्स सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

  • Special Edition Petrol Manual – 7,00,000
  • Special Edition Petrol CVT – 7,90,000
  • Special Edition Diesel Manual – Rs 8,30,000
  • Special Edition Diesel CVT – Rs 9,10,000