
Mahindra XUV700 लॉन्च झाल्यापासून हिंदुस्थानात याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आतापर्यंत या एसयूव्हीच्या 70 हजाराहून अधिक युनिट्स बुक झाल्या आहेत. कंपनीने डिसेंबर 2021 अखेर 14,000 कारच्या डिलिव्हरीचे लक्ष्य ठेवले आहे. ही कार कंपनीने 5-सीटर आणि 7-सीटर अशा दोन्ही पर्यायांमध्ये लॉन्च केली आहे.
5 स्टार सेफ्टी रेटिंग
कंपनीने याची बुकिंग 7 ऑक्टोबरपासून सुरू केली होती. तसेच याची डिलिव्हरी 30 ऑक्टोबरपासून सुरू केली आहे. आता या एसयूव्हीला ‘ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टम’ध्ये 5 स्टारची सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. या एसयूव्हीने ऍडल्ट प्रोटेक्शन कॅटगरीत संभाव्य 17 पैकी 16.03 गुण मिळवले आणि चाईल्ड प्रोटेक्शन कॅटगरीमध्ये 49 पैकी 41.66 गुण मिळवले आहेत. या कारला 66.00 पैकी 57.69 गुण मिळाले आहेत. या गुणांसह ही एसयूव्ही हिंदुस्थानातील सर्वात सुक्षित कार ठरली आहे. टेस्टिंग केलेल्या मॉडेलमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ABS, सीटबेल्ट रिमाइंडर, फ्रंट सीटबेल्ट प्रीटेन्शनर्स आणि ISOFIX अँकरेजसह एंट्री-लेव्हल व्हेरिएंट होते.
इंजिन
XUV700 एसयूव्हीमध्ये पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही इंजिन पर्याय उपलब्ध आहे. यात mStallion 2.0 टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 200 HP पॉवर आणि 380 NM टॉर्क जनरेट करते. तसेच यात डिझेल युनिट 2.2-लिटर mHawk इंजिन देण्यात आले आहे. जे 182 HP पॉवर आणि 450 NM टॉर्क जनरेट करते.
कंपनीने या मिडियम आकाराच्या SUV XUV700 ची किंमत इंट्रोडक्टरी लेव्हलवर 5 आणि 7 सीटर पर्यायांमध्ये 11.99 लाख रुपये इतकी ठेवली होती. पहिल्या 25,000 युनिट्सची बुकिंग झाल्यानंतर आता याच्या वेगवेगळ्या मॉडेल्सनुसार याची किंमत 50,000 रुपयांपर्यंत वाढली आहे. आता या एसयूव्हीची किंमत 12.49 लाख रुपयांपासून सुरू आहे. तसेच याच्या टॉप मॉडेलची किंमत 22.99 लाख रुपये इतकी आहे.



























































