Royal Enfield च्या विक्रीत जबरदस्त वाढ, बाजारात वाढली मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवीन महिन्याच्या सुरूवातीस वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या विक्रीचा अहवाल सादर करण्यास सुरवात केली आहे. देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी Royal Enfield साठी मार्च महिना हा खूपच फायदेशीर ठरला आहे. या महिन्यात कंपनीने एकूण 60,173 युनिट्सची विक्री केली आहे. जी मार्च 2020 च्या तुलनेत 84 टक्के अधिक आहे.

मार्च 2020 मध्ये कंपनीने फक्त 32,630 युनिट्सची विक्री केली होती. तसेच कंपनीने या कालावधीत 5,885 वाहनांची निर्यात केली आहे, जी गेल्या वर्षी मार्च महिन्यात फक्त 3,184 वाहने इतकी होती. इतर देशांमध्येही आपली पकडक मजबूत करण्यासाठी कंपनीला निर्यात व्यवसाय ही खूप महत्वाचा आहे.

कंपनीच्या एकूण विक्री आकडेवारीवर नजर टाकल्यास जास्त मागणी 350cc सेगमेंटमधील बाईकची असल्याचे दिसत आहे. कंपनीच्या एकूण विक्रीपैकी 88.51 टक्के या सेगमेंटमधील बाईकचा समावेश आहे. या सेगमेंटमध्ये कंपनीची Classic, Meteor, Electra आणि बुलेट सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. तसेच 650 सीसी सेगमेंटमध्ये कंपनीच्या कॉन्टिनेंटल जीटी आणि इंटरसेप्टर्सचा समावेश आहे. जी एकूण विक्रीच्या 11.49 टक्के आहे.