नांदेड येथे ऑटोमोबाईल दुकानाला आग, 25 लाखांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नांदेड

नांदेड येथील अण्णाभाऊ साठे चौकतील दातिवाला पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या शिवकृपा ऑटोमिबाईल्सला रविवारी पहाटे चारच्या सुमारास आग लागली. या आगीत ऑटोमिबाईल्स चे दुकान जळून खाक झाले. या आगीत जवळपास 25 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

आगीची घटना दुकानाच्या शेजारी असलेल्या रहिवाशांना लक्षात आली. दुकान आणि दुकानाच्या पाठीमागे दुकान मालक नागोराव ईबीतवार यांचे घर आहे. आग लागली तेव्हा ईबीतवार कुटुंबीय घरात झोपले होते. बाजूच्या रहिवाशांनी ईबीतवार कुटुंबीयांना या झोपेतून जागे करून घराबाहेर काढले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमनचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमनच्या जवानांनी एका बंबाच्या साहाय्याने आग विझवली. पण या आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. या आगीत जवळपास 25 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती दुकान मालक नागोराव ईबीतवार यांनी दिली आहे.