जाणून घ्या कधी लॉन्च होणार Yamaha FZ-X बाईक, मिळणार जबरदस्त फीचर्स…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Yamaha Motor India हिंदुस्थानात लवकरच आपली नवीन FZ-X निओ रेट्रो बाईक लॉन्च करणार आहे. अलीकडेच ही बाईक स्पॉट करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही महिन्यातच ही बाईक विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ही बाईक 150 सीसी सेगमेंटमधील बाईक आहे. तसेच ही बाईक दिसायला अत्यंत स्टायलिश आणि जबरदस्त फीचर्ससह लॉन्च होणार आहे.

Yamaha FZ-X च्या किंमत बद्दल अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या बाईकची किंमत कंपनी 1.15 लाख रुपये ठेवू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याची लांबी 2,020 मिमी, रुंदी 785 मिमी आणि उंची 1,115 मिमी आहे.

कंपनी या बाईकमध्ये 149cc चे एअर कुल्ड इंजिन देणारा आहे. जे 12.4bhp ची पॉवर आणि 13.3nm टॉर्क जनरेट करेल. याचे इंजिन 5-स्पीड मॅश ट्रांसमिशनवर मॅट करण्यात आले आहे. यात कंपनी टेलीस्कोपिक फ्रंट सस्पेंशन, मोनोशॉक रीअर सस्पेंशन सारखे फीचर्स देऊ शकते. तसेच यात ब्लूटूथ, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम यासारख्या हायटेक फीचर्स दिले जाऊ शकते.