IPL 2021 ‘बापू’ पुन्हा मैदानात उतरणार, दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू झाला कोरोनामुक्त

दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याने कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रुग्णालयात तीन आठवडे उपचार घेतल्यानंतर तो आता पूर्णपणे बरा झाला असून इंडियन प्रीमिअर लीगचा 14 वा हंगाम गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. दिल्लीच्या आगामी लढतींमध्ये तो मैदानात दिसण्याची शक्यता आहे.

आयपीएल 2021 खेळण्यासाठी अक्षर पटेल 28 मार्चला दिल्लीच्या संघात सहभागी झाला होता. त्याचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र 3 एप्रिलला करण्यात आलेल्या चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळला. त्याच्यामध्ये सौम्य लक्षणे दिसून आली होती. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कोरोनावरील उपचार घेऊन आता अक्षर पटेल कोरोनामुक्त झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. ‘बापू (अक्षर पटेल) दिल्ली कॅपिटल्सच्या शिबिरामध्ये परत आल्याने सर्वांचे चेहरे आनंदाने फुलले आहेत’, असे ट्वीट दिल्ली कॅपिटल्सने केले आहे.

दिल्ली मजबूत

अक्षर पटेल संघात पुनरागमन करत असल्याने दिल्लीचा संघ मजबूत झाला आहे. दिल्लीने स्पर्धेत आतापर्यंत 4 लढती खेळल्या असून यातील 3 जिंकल्या आहेत. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणारा दिल्लीचा संघ सध्या तिसऱ्या स्थानावर आहे.

IPL 2021 सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का, मुख्य खेळाडू स्पर्धेतून बाहेर

आपली प्रतिक्रिया द्या