डॉ. अविनाश सुपे, डॉ. बसंत कुमार मिश्रा यांना बी. सी. रॉय पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

महापालिकेचे वैद्यकीय शिक्षण संचालक, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे, हिंदुजा रुग्णालयाचे सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. बसंत कुमार मिश्रा यांना प्रतिष्ठsचा बी. सी. रॉय पुरस्कार घोषित झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च गौरव मानला जाणारा हा पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

निष्णात डॉक्टर, स्वातंत्र्यसैनिक डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 1 जुलै हा डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या नावाने हा वैद्यकीय क्षेत्रातील हा सर्वोच्च सन्मान दिला जातो. डॉ. अकिनाश सुपे यांची ‘एमिनंट मेडिकल टिचर’ या कर्गकारीतील पुरस्कारासाठी डॉ. सुपे यांची निकड करण्यात आली आहे. तज्ञ शल्यचिकित्सक अशी देशभरात ख्याती असणारे डॉ. अकिनाश सुपे हे उत्तम प्रशासक असण्यासोबतच किद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणूनही ओळखले जातात. त्याचप्रमाणे हिंदुजा रुग्णालयाचे डॉ. बसंत कुमार यांना ‘सर्काधिक ख्यातनाम क्यक्तिमत्क’ या  वर्गवारीत हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. डॉ. मिश्रा हे हिंदुस्थानातील आघाडीच्या न्यूरोसर्जन्सपैकी एक आहेत आणि ते 1995 पासून पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल आणि एमआरसीसोबत जोडलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल हे गॅमा नाइफ रेडिओसर्जरी फॅसिलिटी प्राप्त करणारे दक्षिण आशियातील पहिले रुग्णालय ठरले आहे.