नाशिकमध्ये बी.एस्सी. योगशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नाशिक

नाशिकच्या आदियोग आंतरराष्ट्रीय शिक्षण व अनुसंधान साधनापीठ यांच्या वतीने या शैक्षणिक वर्षापासून तीन वर्षांचा बी.एस्सी. योगशास्त्र्ा हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

विज्ञान शाखेशिवाय अन्य शाखेचे विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेवू इच्छित असतील, तर त्यांना एक महिन्याचा योग सेतू अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच योग व निसर्गोपचार हा एक वर्षाचा अभ्यासक्रमही संस्थतेर्फे सुरू करण्यात आला आहे.

आदियोग महाविद्यालयातर्फे दोन वर्षांपासून योग प्रयोग पदविका, संस्कृत आगम पदविका व एम.ए. योगशास्त्र्ा हे अभ्यासक्रम शिकविले जातात. अनेक विद्यार्थ्यांनी हे अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण व योग शिक्षणाच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी, नागरिकांनी चांडक सर्कल येथील या महाविद्यालयाशी किंवा 9890735481, 8805784510 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्या सुलभा गवळी, संस्था प्रमुख संजय गवळी यांनी केले आहे.