
काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी भाजप हा मित्रांना वापरून फेकून देणारा पक्ष असल्याची टीका केली होती. त्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.
जानकर यांच्या वक्तव्याचं समर्थन करताना बच्चू कडू यांनी भाजपला सणसणीत टोला लगावला आहे. अकोला येथे बोलताना ते म्हणाले की, भाजपची भूमिका मित्रांना सोबत घ्यायचं आणि काम झालं की सोडून द्यायचं अशी आहे. जोपर्यंत चलती आहे तोपर्यंत हे सुरू राहील, असं ते म्हणाले. अमरावती येथील लोकसभेवर प्रहारचा दावा कायम असल्याचंही ते यावेळी म्हणाले.




























































