Bajaj Pulsar चे दोन नवीन मॉडेल लॉन्च, पॉवरफूल फीचर्स अन् किंमत जाणून घ्या…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असून Bajaj Auto या लोकप्रिय मोटारसायकल कंपनीने Bajaj Pulsar चे दोन नवीन मॉडेल बाजारात उतरवले आहेत. Bajaj Pulsar N250 आणि Bajaj Pulsar F250 हे दोन मॉडेल कंपनीने लॉन्च केले आहेत. या दोन्ही मॉडेलचे पॉवरफूल फिचर्स आणि किंमत जाणून घेऊया…

Bajaj Auto ने Bajaj Pulsar 250 च्या दोन्ही मॉडेलचे रिडिझाईन केले आहे. कंपनीने या बाईका नवीन ट्यूबरल फ्रेम चेसीसवर डेव्हलप केले असून फ्रंटबाजूला टेलिस्कोपिक सस्पेंशन फोर्क देण्यात आले आहे. तसेच रिअरवर कंपनीने नवीन मोनोशॉक सस्पेंशन यूनिक दिले आहे.

bajaj-pulsar

Bajaj Pulsar 250 मध्ये कंपनीने DTS-i4 स्ट्रोक ऑईल कूल्ड इंजिन दिले आहे. BS-6 प्रारुपातील हे इंजिन 24.5 PS मॅक्सिमम पॉवर आणि 21.5 Nm चा टॉप पीक टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये कंपनीने 5 स्पीड ट्रान्समिशन मोड देण्यात आले आहे. तसेच या बाईकमध्ये 300 mm फ्रंट डिस्क ब्रेक आणि 230 mm चे रिअर डिस्क ब्रेक दिले आहेत.

bajaj-pulsar-n250-bajaj-pul

कंपनीने नवीन Bajaj Pulsar 250 दोन रंगांमध्ये लॉन्च केली आहे. याल ग्राहकाला रेसिंग रेड आणि टेक्नो ग्रे कलर मिळतो. Bajaj Pulsar N250 आणि Bajaj Pulsar F250 या दोन्ही मॉडेलमध्ये जास्त काही फरक नाही. मात्र दोन्ही बाईकच्या एक्सटीरियर लूकमध्ये बदल पाहायला मिळतो. Bajaj Pulsar N250 चा लूक नेकेड स्ट्रीटफायटर स्टाईलचा आणि Bajaj Pulsar F250 चा लूक सेमी-फेअर्ड सेटअपचा आहे.

bajaj-pulsar-f250

किंमत –

Bajaj Pulsar N250 मॉडेलची एक्स शोरुम किंमत 1 लाख 38 हजार रुपये आहे.

Bajaj Pulsar F250 मॉडेलची एक्स शोरुम किंमत 1 लाख 40 हजार रुपये आहे.