‘बालिका वधू’च्या दिग्दर्शकावर आली भाजी विकण्याची वेळ!

कोरोनाच्या महामारीमुळे सर्वच उद्योगांना बसला. चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग काही महिने ठप्प झाल्याने सेलिब्रिटींना देखील याची मोठी झळ बसली. संसाराचा गाडा हाकण्यासाठी ‘बालिका वधू’, ‘कुछ तो लोग कहेंगे’ आदी मालिकांचे दिग्दर्शक रामवृक्ष गौर यांच्यावर आता दारोदारी फिरून भाजी विकण्याची वेळ आली आहे.

रामवृक्ष हे सध्या उत्तर प्रदेशातील आजमगढ जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी भाजी विकण्याचे काम करीत आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यावर ते मुंबईवरून आपल्या मूळ गावी परतले होते. मात्र कामकाज नसल्याने आर्थिक घडी विस्कटल्याने पुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी भाजी विकण्याचा निर्णय घेतला. रामवृक्ष हे 2002 पासून छोटय़ा पडद्यावर काम करीत आहेत. याशिवाय काही लोकप्रिय मालिकांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. भविष्यात पुन्हा संधी मिळाली तर नव्याने टीव्ही उद्योगात नशीब आजमावण्याची इच्छा रामवृक्ष गौड यांची आहे.

आपली प्रतिक्रिया द्या