बांग्लादेशी विद्यार्थ्यांचा माजोरडेपणा, विलगीकरण कक्षात जाण्यास नकार देत विमानतळावर तोडफोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. संपूर्ण जग एकत्र येऊन या विषाणूशी लढत आहे. अशा वेळी बांग्लादेशी विद्यार्थ्यांनी जम्मू कश्मीरच्या विमानतळावर माजोरडेपणा दाखवला आहे. विमानतळाच्या अधिकार्‍यांनी त्यांना जेव्हा विलगीकरण कक्षात जाण्यास सांगितले तेव्हा या विद्यार्थ्यांनी अरेरावी केली. विलगीकरण कक्षात जाण्यास नकार देत विमानतळावर तोडफोड केली.

ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार जम्मू कश्मीर विमानतळावर दीडशेहून अधिक बांग्लादेशी विद्यार्थी आले होते. जेव्हा त्यांना विलगीकरण कक्षात जाण्यास सांगितले तेव्हा ते भडकले. त्यांनी विलगीकरण कक्षात जाण्यास नकार दिला. इतकेच नव्हे त्यांनी अधिकार्‍यांशी अरेरावी केली. तसेच विमानतळावरील दारे खिडक्याही तोडल्या. त्यांच्या पालकांनीही विमानतळाबाहेर आंदोलन सुरू केले. त्यानंतर अधिकार्‍यांनी पोलिसांना पाचारण केले.

पोलीस आल्यानंतरही हे विद्यार्थी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.पोलिसांसमोर त्यांनी तोडफोड केली. तेव्हा जमावाला पांगवण्यासाठीत पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. नंतर सर्व विद्यार्थ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.