बांग्लादेशच्या पहिल्या हिंदू माजी सरन्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचा आरोप

11


सामना ऑनलाईन । ढाका

बांग्लादेशचे पहिले हिंदू माजी सरन्यायाधीश सुरेंद्र कुमार सिन्हा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. सिन्हा यांनी 4,75 हजार डॉलरचा गैरव्यवहार आणि मनी लाँडरिंग केल्याचा आरोप भ्रष्टाचारविरोधी आयोगाने त्यांच्यावर ठेवला आहे. मात्र, सिन्हा यांनी याबाबत धक्कादायक वक्तव्य केले आहे. आपल्याला सक्तीने राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आपण देश सोडल्यानंतर हे आरोप झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जानेवारी 2015 मध्ये सिन्हा यांची बांग्लादेशचे 21 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. भ्रषाचारविरोधी आयोगाने त्यांच्यासह 10 जणांवर मनीलाँरिंगप्रकरणी आरोप ठेवले आहे. अकार्यक्षम आणि गैरवर्तन करणाऱ्या न्यायाधीशांना पदावरून हटवण्याचा अधिकार संसदेला देणाऱ्या 16 व्या घटनादुस्तीला त्यांनी विरोध केला होता. त्यामुळे ते चर्चेत आले होते. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि अनेक वरिष्ठ मंत्र्यांचा त्यांच्याशी तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे सिन्हा यांनी राजीनामा द्यावा, यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. 2 ऑक्टोबर 2017 मध्ये सरन्यायाधीश एका महिन्याच्या आजारपणाच्या रजेवर जात असल्याचे कायदामंत्र्यांनी सांगितले होते. 13 ऑक्टोबरला देश सोडून सरन्यायाधीश ऑस्टेलियाला गेले होते. मात्र, आपण आजीर नसून आपल्याला सक्तीने राजीनामा देण्यास भाग पाडल्याचे सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे. सिन्हा यांनी देश सोडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिगसह 11 गुन्हे दाखल असल्याचे सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या