
सामना प्रतिनिधी ! वडवणी
‘जनआशीर्वाद’ यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्वच जिल्हय़ांत, तालुक्यांत, गावागावांत शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे जात आहेत. त्यांची निवेदने, अडचणी जाणून घेत आहेत. ही जनआशीर्वाद यात्रा रविवारी बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात येत असताना बाबी तांडा येथील बंजारा समाजाच्या महिलानी अचानक ताफा अडवून औक्षण करत समाजाच्या मागण्यांचे निवेदन दिले.
जनसंवाद यात्रेचा ताफा चालत असताना अचानक बंजारा समाजाच्या महिलां समोर आल्या. लागलीच युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे गाडीतून खाली उतरले. महिलांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी अदित्य ठाकरे म्हणाले, खरंच मी खूप भाग्यशाली आहे. आपल्यासारख्या माता माउलींनी माझे औक्षण केले. महिलांच्या विविध मागण्यांचे निवेदन घेत प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही देत वडवणीकडे जाण्यास निरोप घेतला. त्याच्या समवेत बंजारा समाजाच्या महिलांही जनसंवाद यात्रेत सहभागी झाल्या.


























































