बँकांतील एक लाख रुपयांचीच गॅरंटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बँक तोटय़ात गेली तर त्या बँकेतून ग्राहकांना जास्तीत जास्त एक लाख रुपयेच मिळू शकतात. बँकेने केवळ एक लाख रुपयांचीच हमी  घेतली आहे. माहिती अधिकारातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

बचत, फिक्स, करंट आणि रिकरिंग या खात्यांवर लागू आहे असे रिझर्व्ह बँकेशी संबंधित ‘डिपॉझिट इन्शुरन्स ऍण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन’ (डीआयसीजीसी) या संस्थेने स्पष्ट केले आहे. डीआयसीजीसी कायद्यातील कलम 16(1) अनुसार बँकेचे दिवाळे निघाले तरी डीआयसीजीसी ही क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन संस्था ग्राहकांना केवळ एक लाख रुपयांपर्यंत रक्कम परत देणार आहे.