नदीकाठाऐवजी पूलावरील पूराच्या पाण्यात धुतले कपडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील अनेक राज्यांमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार उडवला आहे. यामुळे नजारे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पुणे व बारामतीमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बारामती शहराजवळील नजारे धरणातून 85000 क्‍यूसेक पाणी सोडण्यात आल्याने अनेक घरात पाणी शिरले असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी पूलावरुन वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात महिला कपडे धुत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

सोनगाव येथे नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून संततधार पावसामुळे घरे, रस्ते व पूलही पाण्याखाली गेले आहेत. यामुळे अनेकजण जागोजागी अडकले आहेत. तर

पुणे शहर व उपनगरात बुधवारी रात्री पावसाने थैमान घातले. पावसाच्या वेगवान प्रवाहामुळे भिंत कोसळली. अनेक ठिकाणी पाणी इमारतींमध्ये शिरले. नालेही भरुन वाहू लागल्याने मोटारी व दुचाकीही वाहून गेल्याच्या घटना घडल्या.या पावसाने पुण्यात 16 जणांचे बळी घेतले.