चहा प्यायल्यावर किंवा जेवल्यानंतर लगेच अंघोळ केल्याने शरीरावर होऊ शकतात गंभीर परिणाम, वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजच्या बदलत्या आणि अतिव्यस्त जीवनशैलीमुळे आपल्याकडून होणाऱ्या छोट्या-छोट्या चुकीच्या सवयींमुळे अनेक आजारांना बळी पडण्याची शक्यता वाढत आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बरेच बदल झाले आहेत. निरोगी शरीरासाठी पुरेसे पोषण, सकस आहार, व्यायाम, योगासने आणि शारीरिक हालचाली खूप महत्त्वाच्या आहेत. अशा स्थितीत शरीर निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्यावा आणि नियमित व्यायाम केला पाहिजे, मात्र तुम्हाला माहीत आहे का, हेल्दी फूड खाल्ल्यानंतरही काही रोजच्या सवयींमुळे तुम्ही आजारी पडू शकता. काही चुकीच्या सवयींमुळे रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड आणि इतर अनेक आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. तंदुरुस्त राहण्यासाठी काही चुकीच्या सवयी टाळणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया, निरोगी राहण्यासाठी कोणत्या सवयी टाळणे गरजेचे आहे.

खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ का करू नये ?
जेवल्यानंतर आंघोळ करणे धोकादायक ठरू शकते. रुचकर, पौष्टिक अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर अंघोळ केल्याने अन्नाचा शरीरावर होणारा प्रभाव कमी होऊ शकतो. याचे कारण आंघोळीला गेल्यावर लगेचच शरीराचे तापमान कमी होते यामुळे पचनसंस्थेत ढिलाई होते. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही आणि याउलट जर तुम्ही गरम पाण्याने अंघोळ करत असाल आणि त्यामुळे शरीराचे तापमान कमी होणार नाही आणि अन्नपचनही होईल. जेवणानंतर शरीराची सर्व ऊर्जा पोटाकडे जाते आणि अन्नपचनाला सुरुवात होते, मात्र लगेचच अंघोळ केल्यामुळे अन्नपचनाच्या प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात, याचे कारण पचनक्रिया मंदावते. काही वेळा शरीराचे तापमान वाढले तरी यामुळे रक्तदाब आणि ह्रदयाचे ठोके वाढू शकतात, ही गंभीर शारीरिक समस्या ठरू शकते.

चहा प्यायल्यानंतर अंघोळ केल्यास काय होते?
अनेकांना सकाळी चहा घेतल्यानंतर अंघोळीला जाण्याची सवय असते. चहा घेतला की काही जण लगेच अंघोळ करतात, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. चहा प्यायल्यानंतर शरीराचे तापमान बदलते. त्यानंतर ताबडतोब अंघोळ केल्याने शरीराचे तापमान पुन्हा बदलत असल्याने याचा रक्ताभिसरणावर परिणाम होतो. .