
बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी कसोटीपटू सौरभ गांगुली यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते सध्या कोलकाता येथील वुडलँड्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. गांगुली यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशिरा गांगुली यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार गांगुली यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे






























































