मल्ल्यासारखे ‘स्मार्ट’ बना, भाजपच्या केंद्रीय मंत्र्याची शिकवण

सामना ऑनलाईन । हैदराबाद

तुम्ही सारे लोक विजय मल्ल्या याला लाखोली वाहता, पण तो कोण आहे हे तरी ठाऊक आहे काय? तो अतिशय स्मार्ट माणूस आहे, असे सांगतानाच मल्ल्यासारखे ‘स्मार्ट’ बनावे अशा शब्दांत केंद्रीय आदिवासी विकासमंत्री जुएल ओराम यांनी आज आदिवासींपुढे मल्ल्याचा ‘आदर्श’ ठेवला. ते राष्ट्रीय आदिवासी उद्योजकता संमेलनात मार्गदर्शन करताना बोलत होते.

विजय मल्ल्या हा अतिशय बुद्धिमान माणूस आहे. त्याने हुशार लोकांना स्वतःकडे कामाला ठेवले आणि बँक अधिकारी, नेते, सरकार यांना मुठीत घेतले. व्यवस्थेवर प्रभाव पाडला. तसे करण्यापासून तुम्हाला कोणी रोखले आहे, असा सवाल केंद्रीय मंत्र्यांनी केला. नंतर मात्र ओराम यांनी चुकीची शिकवणी घेतल्याबद्दल माफीही मागितली.