लग्नाच्या वेबसाइट्सवर ‘लखोबां’पासून सावधान

सामना ऑनलाईन । ठाणे

लग्न जुळवून देणाऱ्या वेबसाइट्सवरून ३० वर्षीय तरुणीशी जवळीक साधून तिला लाखोंचा गंडा घातल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचारही केला. मात्र त्याचे याआधीच लग्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली असून आरोपी प्रमोद काकडे (३५) अद्याप फरार आहे.

घोडबंदर रोड येथे राहणाऱ्या ३० वर्षीय पीडित तरुणीची ऑनलाइन लग्न जुळणाऱ्या भारत मेट्रोमोनी वेबसाइटवरून कल्याणच्या प्रमोद काकडेसोबत ओळख झाली. त्याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. तिच्याकडून दोन लाख ६३ हजारांची रक्कम उकळून ६८ हजारांचा मोबाईलही त्याने घेतला. काही दिवसांनी त्याचे दुसरे लग्न झाल्याचे तरुणीच्या लक्षात आले. त्यामुळे प्रमोदचा भंडाफोड झाला. मात्र त्यानंतर प्रमोदने तिला फोनवरून याबाबत कोणाकडे वाच्यता करू नको, अशी धमकी दिली.