
जगावर आलेल्या कोविड संकटाचे धक्के अजूनही बसत आहेत. सैन्यानंतर 24 तास सतत कार्यरत असलेल्या रेल्वेला देखील याचा फटका बसला आहे. कोरोना साथीच्या काळात रूग्णांच्या उपचाराकरीता खास बनविलेले कोविड बेड आणि लीननचा केलेला वापर तसेच मजूरांच्या स्थलांतरामुळे कंत्राटीतत्वावर सुरू केलेल्या खाजगी टनेल लॉड्री ठप्प झाल्याने मेल-एक्सप्रेसमध्ये चादरी व उशा पुरविणे रेल्वे प्रशासनाने बंद केल्याचे उघडकीस आले आहे. ऑगस्टमध्ये मध्य रेल्वेच्या सर्व मेल-एक्सप्रेसमध्ये लीनन सेवा पुर्ववत होणार आहे.
मध्य रेल्वेला सहा लाख कोचेसची गरज असते. उत्तरेकडे जाणारी एक लांबपल्ल्याची ट्रेन चालवायची तर सहा कोच स्पेअरमध्ये ठेवाव्या लागत आहेत. सध्या कोचेसची टंचाई असून 93 पैकी 47 मेल-एक्सप्रेस चादरी व उशा मिळत असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले. ही सेवा पूर्ववत होण्यासाठी जुलैअखेर उजाडणार असून ऑगस्टपासून मध्य रेल्वे प्रवाशांना या सुविधा पुरविण्यास सक्षम होईल असेही मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले.
– सध्या 93 पैकी 47 मध्ये बेडरोल
– सध्या दररोज लागणारे बेडशिट – 55, 000
– कोरोनाआधी रोज लागणारे बेडशिट -1,04,000


























































