37 हजाराची लाच घेतांना बीडचे बीडीओ जाळ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
बीड मंजूर झालेल्या विहिरीचे बिल मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी करत 37 हजाराची लाच घेताना बीड अन पाटोदा येथील बीडीओ नारायण मिसाळ यास त्याच्या राहत्या घरी जेरबंद करण्यात आले
शेतकऱ्याची मंजूर झालेली विहीर काम सुरू असताना या विहिरीचे बिल मंजूर करण्यासाठी बीडीओ नारायण मिसाळ टाळाटाळ करत लाचेची मागणी करत होता, हे बिल मंजूर करण्यासाठी त्याने 37 हजाराची मागणी केली होती तक्रार दार शेतकऱ्याने लाच लुचपत विभागाकडे धाव घेतली आज बुधवारी 37 हजाराची लाच घेताना बीडीओ नारायण मिसाळ यास त्याच्या नगर रोड वरील घरी  लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले , या घटनेने पंचायत समिती प्रशासनात खळबळ उडाली आहे