वीर सावरकरांबाबत बेताल विधान करणाऱ्या राहुल गांधींचा पुतळा जाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, बीड

“काँग्रेसचे नेते जेव्हा इंग्रजांच्या विरोधात लढत होते आणि 15-20 वर्षे कारागृहात शिक्षा भोगत होते तेव्हा तुम्ही ज्यांचे समर्थन करतात ते वीर सावरकर इंग्रजासमोर हात जोडून माफी मागत होत” हे बेताल विधान करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे भाजप कार्यकर्त्यांनी दहन केले. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश गुरखुदे, वैभव वैद्य, परशुराम संघाचे प्रशांत सुलाखे, अक्षय भालेराव, जिल्हाध्यक्ष गजानन जोशी, बाबा पाठक, दत्ता परळकर, सुरेश पवार, अजिंक्य दोडके, राधेशाम गुरखुदे, मंदार देशपांडे, गणेश काळे, ओम भगत आदी उपस्थित होते.